Markandeshwar Yatra
sakal
वणी: श्रीक्षेत्र मार्कंडेय पर्वतावर सोमवती अमावास्येनिमित्त सोमवारी (ता. २०) होणारा पारंपरिक श्री मार्कंडेश्वर यात्रोत्सव पुन्हा एकदा प्रशासनाने रद्द केला आहे. असुरक्षित मार्ग आणि जीर्ण झालेल्या लोखंडी शिडीमुळे अपघाताचा धोका असल्याचे कारण देत ही यात्रा रद्द करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या कलम ३४ नुसार तीन वर्षांपासून यात्रेवर बंदी घालण्यात येत आहे.