Market Committee Election : 14 बाजार समित्यांसाठी 30 हजार 498 मतदार

voters
votersesakal

नाशिक : राज्यासह जिल्ह्यातील बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांची मतदारयादी अंतिम करण्यात आली. या यादीनुसार १४ बाजार समित्यांसाठी ३० हजार ४९८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये मालेगाव बाजार समितीत सर्वाधिक चार हजार २१८, तर सुरगाणा बाजार समितीत सर्वांत कमी ३६० मतदार आहेत. (Market Committee Election 30 thousand 498 voters for 14 market committees Nashik News)

दोन वर्षांपासून कोरोनामुळे लांबणीवर पडत असलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांना सप्टेंबर २०२२ मध्ये मुहूर्त लागला. राज्य सहकार प्राधिकरणाने राज्यातील ३१ डिसेंबरअखेर निवडणुकीस पात्र असलेल्या २८६ सह नाशिक जिल्ह्यातील १४ बाजार समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे रखडलेल्या बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. प्राधिकरणाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी १४ नोव्हेंबरला प्रारूप मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या.

त्यानंतर याद्यांवर २३ नोव्हेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या. प्राप्त झालेल्या हरकतींवर २ डिसेंबरपर्यंत सुनावणीप्रक्रिया पार पडली. हरकतींवरील सुनावणीप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बुधवारी (ता. ७) जिल्ह्यातील नाशिक, पिंपळगाव, लासलगाव, सिन्नर, येवला, नांदगाव, मनमाड, मालेगाव, चांदवड, देवळा, घोटी, कळवण, सुरगाणा, दिंडोरी या बाजार समित्यांची अंतिम मतदारयादी त्या-त्या तालुक्यातील बाजार समितीच्या आवारात प्रसिद्ध झाली. २३ डिसेंबरला प्रत्यक्षात निवडणूकप्रक्रियेस प्रारंभ होणार असून, २३ डिसेंबर ते २९ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याचा कालावधी असणार आहे. २९ जानेवारीला मतदान होईल.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

voters
Nashik News : आदिवासी बांधवांच्या समस्या सुटणार; सूचनेनंतर यंत्रणा नागरीकांच्या दारात

बाजार समिती मतदारसंघनिहाय एकूण मतदार

तालुका मतदारसंघ

सहकारी संस्था ग्रामपंचायत व्यापारी अडते हमाल मापारी एकूण

देवळा : ५१० ३५२ ४३७ ९६ १ हजार ३९५

घोटी बु . ७१३ ८३५ ४९१ २३१ २ हजार२७०

मालेगाव १ हजार ५८५ १ हजार२४७ १ हजार१२४ २६२ ४ हजार २१८

दिंडोरी ७२० ६३७ ४५९ ५० १ हजार ८६६

लासलगाव ७७७ ५६९ ५४२ ३९७ २ हजार२८५

नाशिक १ हजार३६५ ७६७ १ हजार४८ १५८ ३ हजार३३८

सुरगाणा ३५५ - ५ - ३६०

नांदगाव ६२३ ५६० ३५६ ११२ १ हजार६५१

सिन्नर १ हजार३३९ १ हजार ६८ १७१ ३५२ २ हजार९३०

पिंपळगाव ब. १ हजार४७ ६५३ ७१२ ३७४ २ हजार ७८६

चांदवड १ हजार १२ ८३६ ३१९ १०९ २ हजार२७६

मनमाड २९४ २०९ १४७ १३५ ७८५

येवला १ हजार ४८ ८३२ ४२३ ३५३ २ हजार ६५६

कळवण ४९९ ५६५ ४०६ ११२ १ हजार ५८२

एकूण ११ हजार८८७ ९ हजार१३० ६ हजार६४० २ हजार७४१ ३० हजार ३९८

voters
YIN cabinet meeting | सरकारी मालमत्तेचे संवर्धन, वृद्धी करणे आपल्‍या हाती : डॉ. पुलकुंडवार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com