Market Committee Election : राष्ट्रवादी-शिवसेना विरुद्ध सर्वपक्षीय पॅनेल; येवल्यात 18 जागांसाठी 48 जण रिंगणात

Senior leader Manikrao Shinde, Bhujbal's personal aide Balasaheb Lokhande, BJP leaders Baba Damale, Vasantrao Pawar etc. while withdrawing jokes & various leaders withdrawing nomination papers.
Senior leader Manikrao Shinde, Bhujbal's personal aide Balasaheb Lokhande, BJP leaders Baba Damale, Vasantrao Pawar etc. while withdrawing jokes & various leaders withdrawing nomination papers.esakal

Market Committee Election : येथील बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकरी विकास विरुद्ध शेतकरी समर्थक पॅनल आमने-सामने रिंगणात उतरले आहे. संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी तब्बल ४८ उमेदवार रिंगणात उरले असून दोन पॅनलमध्ये आमने सामने सरळ लढत होणार असल्याने उत्सुकता वाढली आहे.

विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाची विभागणी होऊन दोन्ही पॅनलमध्ये उमेदवार व नेते सहभागी असल्याने राजकारण नव्या वळणावर गेले आहे. (Market Committee Election NCP Shiv Sena vs All Party Pane; 48 people are in the fray for 18 seats nashik news)

बाजार समितीच्या विविध गटातून विक्रमी अर्ज दाखल झाले होते. त्यातून १६९ जणांनी माघार घेतली असून ४८ जण रिंगणात उरले आहेत. संचालक मंडळ निवडणुकीसाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी आमदार मारोतराव पवार, सहकार नेते अंबादास बनकर, शिवसेना (ठाकरे) नेते संभाजीराजे पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनल रिंगणात आहे.

जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, भाजप नेते बाबा डमाळे, सामाजिक कार्यकर्ते गोरख पवार आदींच्या नेतृत्वाखाली भाजपा, शिवसेना (ठाकरे), प्रहार, स्वभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय आदीचा समावेश असलेल्या शेतकरी समर्थक पॅनल अशा दोन पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.

अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. कोणता नेता कुठे आणि कोणता पक्षाचा उमेदवार कुठून हेच सामान्यांना कळेनासे झाल्याचे चित्र आहे. सद्या अलिप्त असलेले आमदार नरेंद्र दराडे व किशोर दराडे यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागून आहे.

माघारीनंतर आज ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण जागेवर कृष्णा कव्हात, महेश काळे, गणेश कोटमे, बापू गायकवाड, ज्ञानेश्वर दराडे हे पाच उमेदवार रिंगणात आहेत. ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल जागेवर सचिन आहेर विरुद्ध झुंजार देशमुख यांची सरळ लढत होईल.

अनुसूचित जातीजमाती जागेवर आरपीआयचे प्रल्हाद (गुड्डू) जावळे, वंचितचे भाऊसाहेब अहिरे, शेतकरी संघटनेच्या संध्या पगारे उमेदवार आहेत. व्यापारी गटातून नंदकिशोर अट्टल, सुरेश अट्टल, शंकर कदम व भरत समदडीया रिंगणात आहेत.

Senior leader Manikrao Shinde, Bhujbal's personal aide Balasaheb Lokhande, BJP leaders Baba Damale, Vasantrao Pawar etc. while withdrawing jokes & various leaders withdrawing nomination papers.
Market Committee Election : लासलगावला 13 अपक्षांचे आव्हान; 49 उमेदवार रिंगणात

सोसायटी गटाच्या सात जागांसाठी सविता पवार, संजय बनकर, छगन आहेर, अलकेश कासलीवाल, भास्कर कोंढरे, श्रावण देवरे, किशन धनगे, संजय पगार, रामदास पवार, रतन बोरणारे, नंदकिशोर शिंदे, रमेश शिंदे, मोहन शेलार, बाळू साताळकर हे १४ उमेदवार रिंगणात आहेत.

सोसायटी महिला राखीव गटात उषाताई शिंदे, पुष्पा शेळके, लता गायकवाड व कल्पना कुर्हे तर इतर मागासवर्ग गटात वसंतराव पवार, विलास भालेराव, हरिभाऊ महाजन रिंगणात आहेत. विमुक्त जाती भटक्या जमाती गटात नारायण आव्हाड, दत्तू वैद्य व कांतीलाल साळवे यांच्यात लढत होईल.

हमाल तोलारी गटात एका जागेसाठी तब्बल १० जण रिंगणात उतरले आहेत. यामध्ये दिलीप गायकवाड, आसाराम गोविंद, सोपान जगताप, अमोल जमदाडे, भानुदास जाधव, वसंत झांबरे, अर्जुन ढमाले, दशरथ नळे, भाऊसाहेब भोसले व विद्यमान संचालक गोरख सुरासे रिंगणात आहेत.

आज चिन्हवाटप होणार

माघारीनंतर उद्या शुक्रवारी चिन्ह वाटप होणार असून चिन्ह घेऊन उमेदवारांना मतदारापर्यंत जाता येणार आहे. अर्थात दोन्ही पॅनलतर्फे मतदारांच्या भेटीची पहिली फेरी जवळपास पूर्ण होत आली आहे. यापुढे आठ दिवसात प्रचार फेऱ्या सोबतच सभांनी वातावरण अधिकच रंगतदार होणार आहे.

Senior leader Manikrao Shinde, Bhujbal's personal aide Balasaheb Lokhande, BJP leaders Baba Damale, Vasantrao Pawar etc. while withdrawing jokes & various leaders withdrawing nomination papers.
Market Committee Election: सुरगाणा बाजार समिती अखेर बिनविरोध! माकपप्रणित किसान विकास प्रगतीचे वर्चस्व

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com