Market Committee Election : सदस्य संख्येइतके मतदानाचा मतदारास अधिकार; सहकार प्राधिकरणाचे पत्र

Voter
Voteresakal

Market Committee Election : जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये एकच व्यक्ती अनेक सोसायट्यांमध्ये प्रतिनिधित्व करत असली तरी संबंधित त्या व्यक्तीला एकदाच मतदान करता येणार असल्याच्या निर्णयावरून सहकार प्राधिकरणाने २४ युटर्न घेतला असून,

संबंधित मतदारास त्या -त्या मतदारसंघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतके मतदानाचा अधिकार पुन्हा बहाल केला आहे. (Market Committee Election Voter right to vote equal to number of members Letter from Cooperative Authority nashik news)

बाजार समित्या निवडणुकीत प्रत्येक मतदाराला संबंधित मतदार संघाच्या वतीने निवडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या संख्येइतके मते देण्याचा अधिकार आहे. बाजार क्षेत्रात सहकारी संस्थेचा मतदारसंघ, ग्रामपंचायत मतदारसंघ,

व्यापारी व आडते मतदारसंघ तसेच हमाल व तोलारी मतदारसंघ या चार मतदारसंघाचा समावेश असून सहकारी संस्थेचा मतदारसंघातून १८ सदस्य ग्रामपंचायत मतदारसंघातून ४ सदस्य,

व्यापारी व आडते मतदारसंघातून २ तर हमाल व तोलारी मतदारसंघातून १ सदस्य निवडले जाणार असल्यामुळे संबंधित मतदारसंघातील प्रत्येक मतदारास संबंधित मतदारसंघाच्या वतीने निवडल्या जाणाऱ्या सदस्यांच्या संख्येइतकी मते देण्याचा अधिकार आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Voter
NMC News : 10 हजार झाडे वेदनामुक्त! ‘खिळेमुक्त’ मोहिमेत जाहिरातदारांवर गुन्हे

संबंधित मतदार संघात एकापेक्षा अधिक उमेदवारांना मते दिल्यास ते एकच मत समजणे अनिवार्य आहे. प्रत्येक मतदारास एक मतदान करता येणार असल्यामुळे संबंधित मतदाराने एका मतदारसंघातून एक मतदान करणे आवश्यक आहे.

तसेच मतदाराला एका उमेदवारास एकापेक्षा अधिक मते देता येणार नाहीत. तसेच एका मतदाराचे नाव एकाच मतदार संघाच्या अंतिम मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळेस समाविष्ट झाल्यास संबंधित मतदारास संबंधित मतदार संघात निवडून द्यावयाच्या सदस्य संख्येइतके मतदान करता येणार आहे.

यामुळे संबंधित मतदारास एकाच वेळी मतदान करता येणार आहे. एका मतदाराचे नाव एका पेक्षा जास्त मतदार संघाचे अंतिम मतदार यादीत समाविष्ट असल्यास त्या मतदाराला एकापेक्षा अधिक मतदारसंघात मतदान करता येणार नाही, असे प्राधिकरणाने बाजार समित्यांच्या निवडणूक अधिकाऱ्यांना २६ एप्रिल रोजी मार्गदर्शनपर पत्रात म्हटले होते.

मात्र, यावर सहकार प्राधिकरणाने २७ एप्रिल रोजी पुन्हा पत्र पाठवीत, मतदानाचा अधिकार पूर्वीप्रमाणे कायम ठेवत मतदानाबाबत मार्गदर्शन सूचना केल्या आहेत. एकापेक्षा अधिक बाजार समितीत मतदार सभासद असल्यास त्यास प्रतिनिधित्व करत असलेल्या बाजार समितीसाठी मतदान करता येईल.

Voter
Maharashtra Din : नाशिकच्या चिवड्याचे नेहरूही होते फॅन; वाचा कोंडाजी चिवडा कसा झाला फेमस?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com