Market Committee Election : लासलगाव, मनमाडमध्ये 30 एप्रिलला मतदान

market committee elections
market committee electionsesakal

नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असून, २८ व ३० एप्रिल अशा दोन टप्प्यांत मतदान प्रक्रीया राबविली जाणार आहे. पहिल्या टप्यात २८ एप्रिलला नाशिकसह पिंपळगाव बसवंत, घोटी, येवला, मालेगाव, चांदवड, देवळा, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, सिन्नर, नांदगाव या बाजार समित्यांसाठी मतदान होईल.

त्यांची मतमोजळी २९ एप्रिलला होईल. तर दुसऱ्या टप्प्यात लासलगाव आणि मनमाड बाजार समितीसाठी ३० एप्रिलला मतदान व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. (Market Committee Election Voting on April 30 in Lasalgaon Manmad nashik news)

सहकार प्रधिकरणाने दिलेल्या आदेशान्वये होणाऱ्या या मतदान प्रक्रियेसाठी निवडणुक अधिकाऱ्यांची नियुक्तीदेखील करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिंबधक डॉ. सतीश खरे यांनी दिली. राज्यातील २८६ कृषी उत्पन्न बाजार समित्यांसाठी दोन टप्प्यांत निवडणुक होत आहे.

सहकार प्रधिकरणाने निवडणुकांचा कार्यक्रम घोषीत केला आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांचाही समावेश आहे. दरम्यान, दोन टप्प्यांत, मतदान होणार असले, तरी सर्व बाजार समित्यांसाठी एकाचवेळी २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होणार आहे.

अर्ज दाखल करण्याची मुदत ३ एप्रिलपर्यंत असून, ५ एप्रिलला छाननी व त्यानंतर ६ एप्रिलला रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. अर्ज माघारीसाठी २० एप्रिलपर्यंत मुदत असेल. त्यामुळे उमेदवारांची अंतीम यादी २१ एप्रिलला प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप होईल. जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी २८ एप्रिलला, तर दोन बाजार समित्यांसाठी ३० एप्रिलला मतदान होईल.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

market committee elections
Nashik News: लासलगाव बाजार समितीत डिजिटल भुईकाटा; शेतकऱ्यांच्या वाहनाचे विनाशुल्क वजनमाप

निवडणुक अधिकाऱ्यांची नियुक्ती

बाजार समिती निवडणुक अधिकारी सहाय्यक

नाशिक नितीन मुंडावरे महेश भंडागे

मालेगाव चंद्रकांत विघ्ने स्वप्नील मोरे

नांदगाव प्रताप पाडवी भाऊसाहेब आहिरे

मनमाड एस. जे. मोरे रवींद्र जाधव

येवला प्रमोद हिले विजय बोरस्ते

लासलगाव शरद घोरपडे मंगेश वैष्णव

पिंपळगाव बसवंत डॉ. अर्जना पठारे सविता शेळके

सिन्नर अर्चना सौंदाणे संजय गायकवाड

चांदवड प्रदीप पाटील अनिल पाटील

कळवण चिंतामण भोये हेमंत बिऱ्हाडे

दिंडोरी रणजीत पाटील अरूण ढोमसे

देवळा सुजय पोटे शरद दराडे

घोटी प्रेरणा शिवदास अशोक काकड

सुरगाणा कांतीलाल गायकवाड सुजीत गायकवाड

market committee elections
Nashik News : ZP ग्रामीण पाणीपुरवठा विभागात सावळागोंधळ! एकाच अभियंत्यांकडे तीन-तीन विभागांचा पदभार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com