अंबासन- ढोलबारे (ता. बागलाण) येथील खासगी ‘कसमादे’ शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांची उन्हाळ्यात गैरसोय होऊ नये, यासाठी बाजार समितीतर्फे विविध सोयी-सुविधा दिल्या जाणार आहेत..वाढता उन्हाचा प्रभाव बघता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून शेतकरी सुलभ लिलावाची वेळ ठरविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना उन्हात उभे राहण्याची वेळ येऊ नये म्हणून मोठ्याप्रमाणात खेळती हवा राहील यासाठी शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची कृषिमाल वाहतुकीची वाहन खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार आवारात आणल्यावर त्या शेतकऱ्याला विश्रांती घेता यावी यासाठी भव्य शेतकरी निवास व विश्रांती भवन उभारण्यात आले आहे. .सायंकाळी भाजीपाला लिलावासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजीपाला लिलाव सायंकाळी होत असल्याकारणाने काही विशेष सुविधांवरही भर देण्यात आली आहे. त्यामध्ये जनरेटर सुविधा, भाजीपाला पॅकिंगसाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहन लोडिंग आणि पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषिमालाच्या दैनंदिन बाजारभावाचे अचूक आकलन व्हावे, पारदर्शकता यावी यासाठी खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार, ढोलबारेने स्वतंत्र पोर्टल विकसित केले असून त्याद्वारे शेतकऱ्यांना दैनंदिन बाजारभावाची माहिती पुरविली जाते. तसेच वेगवेगळ्या समाजमाध्यमांद्वारेही अधिकृत माहीत शेतकऱ्यांपर्यंत पोचविली जाते..शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उत्तम सुविधा सध्या येथे पुरविण्यात येत असून, उन्हाळ्यात शेतकऱ्यांना कुठल्याही अडचणींना सामोरे जाऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. त्याबरोबरच येणाऱ्या काळात बाजार समिती परिसर मोठा कृषी हब म्हणून नावारूपास येणार असल्याचा मानस आहे.सुरेश (नाना) पवार, कृषी बाजाराचे सभापती, ढोलबारे.सीसीटीव्ही यंत्रणेची नजरकृषिमाल आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीच्या आवारात नवीन तंत्रज्ञानाची सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे, तसेच शेतकऱ्यांसाठी लवकरच माफक दरात भोजन तसेच अल्पोपाहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवारात सर्वांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची व्यवस्था केली आहे. शेतकऱ्यांना मोफत कृषी सल्ला पुरविण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.