Nashik News: बाजार समिती सचिव काळे नॉट रिचेबल; बाजार समितीने बंद घरावर चिकटविली नोटीस

Market Committee nashik
Market Committee nashikesakal

Nashik News : कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नाशिक बाजार समितीचे सचिव अरूण काळे यांच्यावर राज्याचे सहसचिव डॉ. धपाटे यांच्या आदेशान्वये निलंबनाची कारवाई झालेली आहे.

तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार बाजार समितीने एक महिन्याच्या आत त्यांची खातेनिहाय चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे.

मात्र सध्या काळे यांच्या राहत्या घराला कुलूप असून, त्यांचा मोबाइलही नॉट रिचेबल असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने बाजार समितीने काळे यांच्या बंद घरालाच आरोपपत्र व नोटीस चिकटविली आहे. (Market Committee Secretary Kale Not Reachable market committee has pasted notice on closed house Nashik News)

सोमवारी (ता. ९) ॲड. मनोज नागापूरकर यांच्याकडून नाशिक रोड येथील कार्यालयात होणाऱ्या खातेनिहाय चौकशीला हजर न राहिल्यास काळे यांच्याविरोधात एकतर्फी निर्णय घेतला जाईल, असा इशारा नोटिशीद्वारे देण्यात आला आहे. यामुळे काळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिक जिल्हयातील दोनशे शेतकऱ्यांची टोमॅटो खरेदी प्रकरणात झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत येथील बाजार समितीचे तत्कालिन सचिव अरुण काळे यांना कारणे दाखवा नोटिस बजावून त्यांच्याकडुन खुलासा सादर करण्याबाबत सूचित केले होते.

तसेच माजी संचालक शंकरराव धनवटे यांनी दिलेल्या तक्रार अर्जावर तत्कालीन पणनमंत्री यांनी काळे यांच्या भ्रष्ट व गैरकारभाराची सखोल चौकशी होऊन कायदेशीर कारवाईबाबत निर्देश दिले होते.

तसेच, काळे यांनी सादर केलेला खुलासा शासन स्तरावरून अमान्य करण्यात आलेला होता. शासन आदेशानुसार कर्तव्यात कसूर केल्याबद्दल सभापती देविदास पिंगळे यांनी निलंबनाचे व खातेनिहाय चौकशीचे आदेश दिले होते.

Market Committee nashik
Navratri Festival 2023 : नवरंगांच्या साड्यांची वाढती क्रेझ! बंदेश पॅटर्नला पसंती

जिल्हा उपनिबंधक यांनी केलेल्या आदेशानुसार खातेनिहाय चौकशी एक महिन्याच्या आत पूर्ण होऊ नये यासाठी काळे हे राहते घर व मोबाइल बंद करून बाहेर गेल्यामुळे बाजार समिती प्रशासनाला आरोप पत्रांची अमलबजावणी करता येऊ शकलेली नाही.

त्यामुळे बाजार समिती प्रशासनाने १२ पानी आरोपपत्र काळे यांच्या घराबाहेरील गेटवर चिकटवून दिले आहे. चौकशी ही ९ ऑक्टोबरला नाशिक रोड येथील पी. व्ही. लोखंडे यांच्या कार्यालयात मनोज नागापूरकर यांच्याद्वारे होणार आहे, असेदेखील नोटिशीमध्ये म्हटले आहे.

सदर चौकशीस सहकार्य न करता आणि हजर न राहिल्यास आपले काहीएक म्हणणे नाही, असे समजून एकतर्फी निर्णय लावण्यात येईल, असेदेखील नोटिशीत म्हटले आहे

Market Committee nashik
Nashik: नाशिक कॅम्पसमध्ये नवीन शिक्षणक्रम! पुणे विद्यापीठ व्‍यवस्‍थापन परिषद बैठकीत विविध विषयांवर चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com