मालेगाव कॅम्प- भारतीय संस्कृतीत पवित्र मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीया सणासाठी बाजारपेठ सजली आहे. नागरिकांनी आधीच आंबे, खरबूज, घागर खरेदीसाठी बाजारात गर्दी केली होती. यावर्षी पर राज्यातून आंबे बाजारात दाखल झाले असल्याने आंबे व घागरीच्या दराने शंभरी पार केली आहे.