
नाशिक : प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्येत राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा देशभरात उत्सव म्हणून साजरा होत असताना श्रीरामाची कर्मभूमी नाशिकही सजत आहे.
शहरातील रस्ते भव्य, आकर्षक रांगोळ्यानी आणि रोषणाईने अधिकच देखणे होत असताना येथील मंगल कार्यालये आणि लॉन्स श्रीराम नामाच्या घोषाने दुमदुमणार आहे.
प्रत्यक्ष प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी २२ जानेवारीला शहरातील सगळी मंगल कार्यालये नागरिकांसाठी अगदी मोफत खुली असणार आहे.
प्रभू श्रीरामाची कर्मभूमी असलेल्या नाशिकमधील लॉन्स, मंगल कार्यालय मालकांनी एकमताने निर्णय घेत श्रीराम भक्तांसाठी मोफत कार्यालये उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. (marriage halls will be free for religious events Jai Shri Ram will roam in office on ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Day Nashik)
नाशिक मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल असोसिएशनतर्फे २२ जानेवारीला नाशिककरांना त्या, त्या विभागातील मंगल कार्यालय, लॉन्स व हॉल सकाळी नऊपासून दुपारी दोनपर्यंत मंगल कार्यालय धार्मिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत.
असोसिएशनचे अध्यक्ष सुनील चोपडा, कार्याध्यक्ष संदीप काकड, सेक्रेटरी शंकरराव पिंगळे, खजिनदार समाधान जेजुरकर, संचालक सुरेंद्र कोठावळे, भाऊसाहेब निमसे, योगेश खैरनार, विक्रांत मते, अनिल सोमवंशी, सुभाष क्षीरसागर, जगदीश चव्हाण, जितेंद्र राका, सचिन भोर, देवदत्त जोशी आदीच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी म्हणजे २२ जानेवारीला मंगल कार्यालये रिकामे असतील अशी मंगल कार्यालय भगवान अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण भारतात उत्सवाने साजरा करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रम जसे मंत्रोच्चार पठण, भजन, पूजा, प्रार्थना, जय घोष इत्यादी धार्मिक विधी व आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी त्या त्या परिसरातील मंगल कार्यालय व लॉन्स, हॉल असोसिएशनतर्फे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
नाशिककरांना त्यांच्या परिसरातील व सोयीच्या मंगल कार्यालयांशी संपर्क साधून नियोजन करता येणार आहे. या निमित्ताने सामाजिक दायित्व म्हणून लॉन्स असोसिएशनतर्फे हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
यात सर्व मंगल कार्यालय मालक, सभासद स्वेच्छेने सामील होऊन या पवित्र कार्यात हातभार लावत आहेत. नागरिकांनी विविध कार्यक्रम आयोजित करून नाशिक मध्ये आध्यात्मिक व सांस्कृतिक, धार्मिक वातावरण निर्माण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
"अयोध्येतील रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनने धार्मिक व आध्यात्मिक कार्यासाठी हा निर्णय घेतला असून नाशिककरांनी त्याचा लाभ घ्यावा." - सुनील चोपडा, अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.