Nashik : तरुणासह विवाहितेने संपवली जीवनयात्रा

suicidal death news
suicidal death newsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात मंगळवारी (ता. ६) गळफास घेऊन आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. द्याने येथील अविवाहित तरुणासह गुलशेरनगर भागातील नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गुलशेरनगरमध्ये राहणाऱ्या शबाना परवीन अझरुद्दीन या नवविवाहितेने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. (Married with young man attempts suicide by hanging nashik Latest Marathi News)

suicidal death news
Flying Drone Case : लष्करी आस्थापनांच्या सुरक्षेला वारंवार दणके

तिला दोन मुले आहेत. मुळची धरणगाव (जि. जळगाव) येथील ही विवाहिता गेल्या काही दिवसांपासून येथे वास्तव्याला आली होती. आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. आझादनगर पाेलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

शहराजवळील द्याने येथे पहाटे तरुणाने गळफास घेतला. विवाह होत नसल्याच्या नैराश्‍यातून स्वप्नील सुभाष चव्हाण (वय ३४) याने घरी कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचे कुटुंब बाहेरगावी गेले असताना, हा प्रकार घडल्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. रमजानपुरा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

suicidal death news
Fraud Crime : रेल्वेत नोकरीचे आमिष; तरुणाला 9 लाखांचा गंडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com