नाशिक- शहर परिसरातील तीन विवाहितांनी पोलिस ठाण्यात धाव घेत सासरच्यांकडून होणाऱ्या छळाविरोधात तक्रारी दिल्या आहेत. त्यानुसार पंचवटी, म्हसरुळ व नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये विवाहितांच्या छळप्रकरणी गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढल्याचे दिसून येते आहे.