कृषी विज्ञान केंद्रात मसाला प्रक्रिया प्रशिक्षण

कृषी विज्ञान केंद्रात मसाला प्रक्रिया प्रशिक्षण
Published on: 
फोटो : NSK26H33852 कोळदा : ‘मसाला प्रक्रिया’ पुस्तकाचे प्रकाशन करताना केदारनाथ कवडीवाले, दीपक पाटील, डॉ. उत्तम होले, उमेश पाटील, आरती देशमुख. ------------------- कृषी विज्ञान केंद्रात मसाला प्रक्रियेचे प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन : उद्योग नोंदणीवर मार्गदर्शन सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. २९ : तालुक्यातील कोळदा येथील डॉ. हेडगेवार सेवा समिती संचलित कृषी विज्ञान केंद्रातर्फे सहभागी महिला, बचतगट, शेतकरी व नवउद्योजकांना पाच दिवसीय मसाला प्रक्रिया प्रशिक्षण देण्यात आले. यात मसाला निर्मिती, उद्योजकता विकास, विपणन, पॅकेजिंग, लेबलिंग, अन्न सुरक्षा परवाना आणि उद्योग नोंदणी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षणार्थींना १४ प्रकारचे मसाले, पाच प्रकारच्या रेडी-टू-ईट ग्रेव्ही तयार करण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान युथ फाउंडेशनचे श्री. शिवाजी परमार यांनी उद्योजकता विकास, व्यवसायाच्या संधी, पॅकेजिंग व लेबलिंग या विषयांवर मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञ अमृता राऊत यांनी रेडी- टू- ईट ग्रेव्ही निर्मितीविषयी सैद्धांतिक माहिती देऊन प्रात्यक्षिक सादर केले. संदीप कुवर यांनी अन्न सुरक्षा परवाना आणि उद्योग नोंदणी प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शास्त्रज्ञ आरती देशमुख यांनी विविध १४ प्रकारचे मसाले तयार करण्याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थींना व्यावसायिक मसाला उत्पादन प्रक्रियेची माहिती मिळावी, यासाठी नंदुरबार येथील महादेव मसाले उद्योगाला भेट देऊन एक्स्पोजर व्हिजिट आयोजित करण्यात आली. या भेटीदरम्यान मसाला निर्मिती प्रक्रिया, उत्पादनाचे पॅकेजिंग आणि उद्योगाच्या कामकाजाविषयी माहिती घेण्यात आली. या प्रशिक्षणामुळे सहभागी महिला, बचत गट, शेतकरी व नवउद्योजकांना मसाला प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली. प्रशिक्षण समारोपाला डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले, आत्मा प्रकल्प संचालक दीपक पाटील, शासकीय कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. उत्तम होले उपस्थित होते. वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते मसाला प्रक्रिया विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. आरती देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. उमेश पाटील यांनी आभार मानले. प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी कोर्स कोऑर्डिनेटर आरती देशमुख यांनी परिश्रम घेतले. प्रशिक्षण यशस्वीतेसाठी केंद्रातील शास्त्रज्ञ जयंत उत्तरवार, पद्माकर कुंदे, उमेश पाटील, डॉ. वैभव गुरवे, डॉ. खुशाल राठोड, राजेश भावसार, प्रवीण चव्हाण, विजय बागल, गीता कदम, संदीप कुवर, किरण मराठे, रजसिंग राजपूत, अश्‍विनी मराठे, अश्विनी पाडवी यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com