Nashik News : काळाराम मंदिर दर्शनावेळी मास्क वापरणे आवश्‍यक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kalaram Mandir

Nashik News : काळाराम मंदिर दर्शनावेळी मास्क वापरणे आवश्‍यक

नाशिक : येथील श्री काळाराम संस्थानतर्फे भाविकांना आवाहन करण्यात आले आहे. कोरोनाच्या सुधारित विषाणूच्या संसर्गाच्या संभाव्य प्रसार व संसर्ग टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. त्यामुळे काळाराम मंदिरात दर्शनावेळी मास्क आवश्‍यक असेल. (Mask must be used while visiting Kalaram temple Nashik News)

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Nashik Crime News : मणियारला 4 दिवसांनी पोलिस कोठडी

पंचवटीतील श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष डॉ. यु. जे. मोरे यांनी कोरोनाच्या संसर्गाला घालूया आळा, मास्कचा वापर करून गर्दी आवश्‍यक टाळावी, असे म्हटले आहे. आपली काळजी आपण स्वतः घेऊ या आणि कोरोनाला हरवू या असेही त्यांनी नमूद केले आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून सूचना प्राप्त झाली आहे.

त्यानुसार शनिवारपासून (ता. २४) भाविकांना सावधगिरी बाळगण्यासाठी मास्कचा वापर करून श्री काळाराम मंदिर व्यवस्थापनास सहकार्य करायचे आहे. तसेच गर्दी टाळण्यासाठी सामाजिक अंतराचे पालन करावे लागणार आहे. कोरोना प्रतिबंधित लसीचे लसीकरण आणि बूस्टर डोस घेऊन सरकार प मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असेही संस्थानतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा: Christmas Holidays : नाताळच्या सुट्यांनिमित्त पर्यटक, भाविकांची गर्दी!