नाशिक रोड- नाशिक रोड शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या शिंदे गावालगत औद्योगिक वसाहतीतील तिरुपती मंगल कार्यालयाशेजारील बारदान गोडाऊनला सोमवारी (ता. १४) पहाटे अचानक आग लागल्याने बारदान मालकाचे मोठे नुकसान झाले.नाशिक रोड येथील अग्निशमन दलाच्या दोन वाहनांच्या जवानांनी आग नियंत्रणात आणून आग विझविण्यात यश मिळविले.