Nashik MD Drug Case: सामनगाव ‘एमडी’ ड्रग्ज टोळीचा मास्टरमाइंड वाघ अखेर जेरबंद

A team of Unit One of the City Crime Branch after arresting a fugitive suspect in the MD drugs case.
A team of Unit One of the City Crime Branch after arresting a fugitive suspect in the MD drugs case. esakal

Nashik MD Drug Case: सामनगाव एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज गुन्ह्यातील टोळीचा मास्टरमाइंड उमेश सुरेश वाघ (रा. चुंचाळे शिवार, अंबड) यास अखेर विरारमधून अटक करण्यात आली आहे. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने वाघ यास मंगळवारी (ता. १२) पहाटे अटक केली असून, दोन महिन्यांपासून पोलिस त्याच्या मागावर होते.

दरम्यान, सामनगाव एमडी ड्रग्ज प्रकरणातील १३ संशयितांना पोलिसांनी अटक करून ‘मोका’ अन्वये कारवाई केली आहे. या टोळीचा मुख्य संशयित व आंतरराष्ट्रीय कुख्यात ड्रग्जतस्कराचा पोलिस अजूनही शोध घेत आहेत. (Mastermind wagh of Samangaon MD drug gang finally jailed nashik crime news)

नाशिक रोड पोलिसांनी गेल्या ७ सप्टेंबरला सामनगाव येथे एमडी ड्रग्ज विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित गणेश शर्मा यास अटक केली होती. त्यानंतर नाशिक शहरात सर्रासपणे एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या सनी पगारे, अर्जुन पिवाल या ड्रग्ज पेडलर्सच्या टोळीला शहर गुन्हे शाखा युनिट एक व अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली होती.

सनी, अर्जुन यांनी या टोळीचा मास्टरमाइंड उमेश वाघ याच्याच माध्यमातून सोलापुरात एमडी ड्रग्ज बनविण्यासाठी कारखाने सुरू केले होते. त्यामुळे गुन्हे शाखा संशयित वाघचा शोध घेण्यासाठी दोन महिन्यांपासून त्याच्या मागावर होती; परंतु तो सतत पोलिसांना हुलकावणी देत पसार होत होता.

अखेर नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास अटक केली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ, सहाय्यक उपनिरीक्षक रवींद्र बागूल, प्रवीण वाघमारे, नझीम पठाण, विशाल काठे, विशाल देवरे, प्रशांत मरकड यांनी बजावली.

A team of Unit One of the City Crime Branch after arresting a fugitive suspect in the MD drugs case.
Nashik MD Drug Case: ललित पाटीलसह तिघांना 10 दिवसांची कोठडी; पोलिसांच्‍या चौकशीकडे लक्ष

...अखेर हाती लागला

मूळचा ठाण्यातील रहिवासी असलेला उमेश वाघ हा कुटुंबीयांसह कोरोनानंतर चुंचाळे शिवारात राहण्यास आला होता. त्याची एक प्रेयसी विरार परिसरात राहत होती. पोलिस सतत त्याच्या मागावर होते. अखेर तो सोमवारी (ता. ११) मध्यरात्री विरार परिसरात आल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना मिळताच त्यांनी वाघ याला अटक करण्यासाठी पथक रवाना केले. पहाटेच्या सुमारास वाघ यास विरारमधील यशवंतनगरमध्ये असलेल्या म्हाडा इमारतीतून अटक करण्यात आली. त्याला नाशिकमध्ये आणण्यात आले आहे.

सोलापुरातील ‘एमडी’मध्ये हात

उमेश वाघ याच्याच माध्यमातून सोलापुरात एमडी ड्रग्ज बनविण्याचे कारखाने सुरू कऱण्यात आले होते. त्यामुळे त्याच्याकडून या टोळीने बनविलेल्या एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्जतस्कराची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे. तीन महिन्यांपासून वाघ बंगळूर (कर्नाटक), केरळ, हैदराबाद (तेलंगणा), आंध्र प्रदेश, तमिळनाडू या परिसरात सतत ठिकाण बदलून राहत होता.

A team of Unit One of the City Crime Branch after arresting a fugitive suspect in the MD drugs case.
Nashik MD Drug Case: एमडी ड्रग्‍ज कारखाना उभारणीसह विक्रीत हरिशपंतचा सहभाग उघड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com