खुले भूखंडांवर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई

खुले भूखंडांवर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई
Published on: 
शहर टुडे पान चारसाठी NSK26H33704 जळगाव : खुल्या भूखंडावरील कचरा समस्याची नागरिकांकडून माहिती घेताना महापौर दीपमाला काळे. ---------- खुले भूखंडांवर कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई ---- महापौरांची प्रभाग दहामध्ये पाहणी; परिसरातील पथदिव्यांच्या दुरुस्तीचे निर्देश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : खुले भूखंड, साचलेले सांडपाणी व बंद पथदिव्यांच्या समस्यांची दखल घेत महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी (ता.२७) महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक दहामधील विविध भागांची पाहणी केली. खंडेरावनगर, मयूर कॉलनी व पिंप्राळा येथील गणपतीनगर परिसरातील नागरी समस्यांचा आढावा घेत त्यांनी संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. खंडेरावनगर परिसरातील खुल्या भूखंडांवर कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापौरांनी हे भूखंड तातडीने स्वच्छ करण्यास सांगितले. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. परिसरातील हायमास्ट दिवे बंद असल्यास त्यांची दुरुस्ती करावी व आवश्यकतेनुसार नवीन दिवे बसवावेत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मयूर कॉलनीतील एका खुल्या भूखंडावर गटारीचे पाणी साचल्याचे पाहून महापौरांनी नाराजी व्यक्त केली. साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करून गटारींच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचे निर्देश बांधकाम विभागाला देण्यात आले. तर पिंप्राळा येथील गणपतीनगर परिसरात पथदिव्यांची समस्या व वीजखांबांवर केबल पेट्या नसल्याची बाब समोर आली. यासाठी महापालिका व वीज कंपनीने समन्वय साधून कामे पूर्ण करावीत, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com