नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास दंड

नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास दंड
Published on: 
सेकंड मेन NSK26H33281 जळगाव : महापौर दीपमाला काळे यांनी गुरुवारी शाहूनगर परिसरात दौरा करत नागरी सुविधांचा आढावा घेतला, त्याप्रसंगी स्थानिक नगरसेवकांसह अधिकारी. ------- नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास दंड उपशीर्षक महापौरांचे निर्देश; शाहूनगर परिसरात नागरी सुविधांची पाहणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २२ : महापौर दीपमाला मनोज काळे यांनी महापौर स्वच्छता संकल्प अभियान अंतर्गत गुरुवारी (ता.२२) प्रभाग क्रमांक ६ मधील शाहूनगर, ट्रॅफिक गार्डन आणि उर्दू शाळा परिसराची अचानक पाहणी करून मनपातील विविध विभागांची झाडाझडती घेतली आणि कडक कारवाईचे निर्देश दिले. ट्रॅफिक गार्डन परिसरात उघड्यावर टाकण्यात येणारा कचरा उचलण्याचे काम सुरू असताना, यापुढे परिसरातील नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकल्यास प्रथम नोटीस आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश महापौरांनी दिले. या वेळी स्थानिक नगरसेवक दीपक सूर्यवंशी, ॲड. शुचिता हाडा, अर्शीनबानो खाटीक यांच्यासह शहर अभियंता आर. टी. पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख समीर बोरोले यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नळांना तोट्यांबाबत सूचना शाहूनगर येथील पाणीपुरवठा विभागास भेट दिली असता एकच कर्मचारी उपस्थित आढळला व इतर कर्मचारी इतर कामावर असल्याचे दिसून आले. यावर महापौरांनी हालचाल रजिस्टर तपासून शाहूनगर भागातील सर्व पाण्याचे कनेक्शन आणि तोट्या तत्काळ दुरुस्त करून पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश दिले. ​उर्दू शाळेची दुरवस्था उर्दू शाळा क्रमांक १२ ची संरक्षण भिंत तुटलेली असून तेथे काही नागरिक भंगार गोळा करत असल्याचे निदर्शनास आले. परिसराचा मोठा भाग वापरविना पडल्याचे पाहून महापौरांनी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्याकडून तातडीने लेखी स्पष्टीकरण मागितले. चौकट ​अतिक्रमण आणि स्वच्छता मोहीम तीव्र शाहूनगर मार्केटमधील दुकानदारांना दुकानासमोर डस्टबिन ठेवण्याची सक्ती करण्यात आली असून ट्रॅफिक गार्डन परिसरात कचरा टाकल्यास दंडाची तंबी देण्यात आली. तसेच, रस्त्यावर धूळ खात बंद पडलेल्या रिक्षा आणि बॉम्बे बिर्याणीसह इतरांचे बेकायदेशीर अतिक्रमण तत्काळ हटवून भंगार म्हणून जप्त करण्याचे आदेश अतिक्रमण विभागाला देण्यात आले असून परिसरातील गटारी मोकळ्या करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com