सेकंडमेन
शहर टुडे पान चारसाठी
-
NSK26H33615
जळगाव : महामार्गावरील समांतर रस्त्यावरील बेशिस्त उभ्या वाहनांच्या समस्या सोमवारी जाणून घेताना महापौर दीपमाला काळे. सोबत उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, प्रतिभा देशमुख, गजाजन देशमुख.
---------------
समांतर रस्त्यावर बेशिस्त उभ्या वाहनांचा अडथळा
------
महापौरांची प्रभाग नऊमध्ये पाहणी; स्वच्छता, पथदिवे, वाहनतळाबाबतचे निर्देश
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. २६ : प्रभागात अनियमित कचरा संकलन, बंद पथदिवे, धोकादायक लोंबकळणाऱ्या वायरी व महामार्गाचा समांतर रस्त्यावर उभी बेशिस्त वाहने अशा विविध समस्यांची महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (ता.२६) स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत प्रभाग क्रमांक नऊमध्ये पाहणी केली. नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना समस्या तातडीने सोडविण्याच्या सूचना दिल्या.
अनियमिततेवर नाराजी
प्रभागात कचरा उचलणारे वाहन नियमित येत नसल्याची बाब समोर आली. त्यावर बीव्हीजी कंपनीच्या पर्यवेक्षका(सुपरवायझर)ला कचरा संकलन नियमित करण्याचे निर्देश देण्यात आले. गटारींची साफसफाई, बंद पथदिव्यांची दुरुस्ती व ‘एसएमआयटी’ महाविद्यालयाजवळील वीजखांबाचे स्थलांतर करण्याच्या सूचनाही महापौरांनी दिल्या. मुक्ताईनगर परिसरातील धोकादायक लोंबकळणाऱ्या वायरी (केबल्स) हटविण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, प्रतिभा देशमुख, गजाजन देशमुख व महापालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
‘त्या’ उपद्रवाची दखल
ऑक्सिजन पार्क परिसरात काही जण मद्यपान व गांजाचे सेवन करून उपद्रव करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याची दखल घेत महापौरांनी पोलिसांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पार्क परिसरात पथदिवे बसविण्याचे निर्देशही देण्यात आले.
आरोग्य केंद्राची पाहणी
महापालिकेच्या आरोग्य केंद्राला महापौरांनी भेट देऊन तेथील औषधसाठ्याची स्थिती जाणून घेतली. काही आवश्यक औषधांचा तुटवडा असल्याचे निदर्शनास आले. दुकानांत कचऱ्यासाठी कचरापेटी ठेवल्या आहेत का?, याची तपासणी करण्यासह ऑक्सिजन पार्कजवळील भुयारी गटाराच्या कामाचीही पाहणी करण्यात आली.
बेशिस्त वाहनांचा अडथळा
गुजराल पेट्रोल पंप पुलाजवळील महामार्गाच्या समांतर रस्त्यालगत मद्याची दुकाने व रुग्णालयात येणारी वाहने थेट रस्त्यात बेशिस्तपणे उभी असतात. त्यामुळे नागरिकांसह वाहनचालकांना मोठी अडचण व अडथळ्यातून मार्ग काढावा लागतो. या पाहणीदरम्यान महापौरांनी संबंधित व्यावसायचालकांना जाब विचारत वाहनतळाची योग्य व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या.