नाशिक- शहर दीड-दोन वर्षांपूर्वी एमडी (मॅफेड्रॉन) नामक अमली पदार्थाच्या कारवाईने राज्यभर चर्चेत आल्यानंतर उशिराने जाग आलेल्या शहर पोलिसांनी याविरोधात धडक कारवाई करीत या प्रकरणाचे रॅकेट उद्ध्वस्त केले असले तरीही शहरातील नशेबाज तरुणाईपर्यंत एमडी ड्रग्ज पोहोचत आहे. चोरी-छुप्यारीतीने सुरू असलेले रॅकेट शहर पोलिसांकडूनही कारवाया थंडावल्याने शहर व त्यालगतच्या भागात नशेबाजांचा ‘दम मारो दम’ सुरूच आहे.