नाशिक: गेल्याच आठवड्यात एमडी (मॅफेड्रॉन) नामक अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रिक्षाचालकाला जेरबंद करण्यात आले असता नाशिक रोडच्या फर्नांडिसवाडीत अमली पदार्थविरोधी पथकाने छापा टाकून सुमारे दोन लाखांचे ३४ ग्रॅम अमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणी पथकाने तीन जणांना अटक केली असून, नवी मुंबईतील वाशी येथून संशयितांनी एमडी आणल्याची कबुली दिली आहे. तिघांना न्यायालयाने शुक्रवार (ता. २२)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.