Mediation center : ‘मध्यस्‍थी’ने दावा निकाली अन् विम्‍यापोटी मिळाले सव्वाकोटी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Insurance claim money

Mediation center : ‘मध्यस्‍थी’ने दावा निकाली अन् विम्‍यापोटी मिळाले सव्वाकोटी!

नाशिक : कर्त्या पुरुषाचे अपघाती निधन झाल्‍यास त्‍याच्यापश्‍चात संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. विमा असल्‍यास न्‍यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून दावा निकाली निघेपर्यंत काही वर्षे जातात. आर्थिक अडचणीत सापडलेल्‍या अशाच कुटुंबांची अडचण दूर करताना जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरणाच्‍या मध्यस्‍थी केंद्रामार्फत विम्‍याचा दावा सव्वा वर्षाच्‍या विक्रमी वेळेत निकाली काढला आहे.

इतकेच नव्,‍हे तर विम्‍यापोटी कुटुंबीयांना ॲड. एफ. बी. सय्यद यांनी विक्रमी सव्वा कोटी रुपयांची रक्‍कम मिळवून दिली आहे. मध्यस्थी केंद्रामार्फत मोठ्या प्रमाणात जास्त रक्कम मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. (mediator center settled insurance claim of crores nashik news)

गेल्‍या वर्षी ६ सप्‍टेंबर २०२१ ला नाशिकच्‍या युवकाचा पुण्यात बसने दिलेल्‍या धडकेत मृत्‍यू झाला होता. मृत युवकाची पत्‍नी व आई-वडिलांनी ॲड. फिरोज सय्यद यांच्यामार्फत नुकसानभरपाईसाठी नाशिक येथील न्यायालयात बसच्या खासगी विमा कंपनीविरुद्ध दावा दाखल केला होता. त्यात ॲड. सय्यद व इशुरन्स कंपनीचे ॲड. अभ्यंकर व विधी अधिकारी सुखप्रित, विक्रांत व्यास यांनी अथक प्रयत्न केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत जिल्‍हा न्‍यायाधीश आर. एम. शिंदे यांच्या मध्यस्थीने व आर. आर. राठी यांच्या खंडपीठात विमा रक्‍कम देण्यात आली. मृताच्‍या वारसांना सव्वाकोटी रुपयांची रक्‍कम देण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्‍हा न्‍यायाधीश एस. डी. जगमलानी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नागरिकांनी मध्यस्‍थी केंद्र तसेच लोकअदालतीचा उचित उपयोग करण्याचे आवाहन त्‍यांनी यानिमित्त केले आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : बळजबरीने कर्जवसुली अन् कर्जदाराच्या पत्नीचाही विनयभंग! सावकाराला अटक

अधिक काळ लागला असता

कोरोना महामारी काळात लॉकडाउनमुळे न्‍यायालयीन प्रक्रिया प्रभावित झाली होती. त्‍यामुळे प्रलंबित खटल्‍यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नियमित सुनावणी व अन्‍य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करताना या प्रकरणी तब्‍बल तीन ते चार वर्षांचा कालावधी लागण्याची शक्‍यता होती. परंतु मध्यस्‍थी केंद्रामुळे सव्वा वर्षात न्‍याय मिळण्यास कुटुंबाला मदत झाली आहे.

"मध्यस्थी केंद्रामार्फत कमी वेळेत लवकरात लवकर न्याय मिळण्यास मदत झाली. त्‍यामुळे नागरिकांनी मध्यस्थी केंद्राचा अधिकाधिक लाभ घ्यायला हवा. विम्‍यापोटी विक्रमी रक्‍कम जलदगतीने मिळवून देता आल्‍याचे समाधान वाटते." -ॲड. एफ. बी. सय्यद

हेही वाचा: Nashik News :...अन् ब्रेक फेल झालेल्या बसला त्यांनी दगड लावून थांबविले!

टॅग्स :InsuranceNashik