नाशिक- रुग्णालयांची नोंदणी, नूतनीकरण करण्यासंदर्भात प्रस्ताव मंजूर करताना काही कर्मचाऱ्यांना रुग्णालय चालकांकडून वाढत चाललेली अपेक्षा यासंदर्भात आयुक्तांकडे वाढत्या तक्रारी लक्षात घेता महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी रुग्णालयांची नोंदणी व नूतनीकरण ऑनलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्वतंत्र संकेतस्थळ विकसित केले असून, रुग्णालयांच्या नोंदणी व नूतनीकरणासाठी ऑनलाइन प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी केले.