नाशिक- कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या मेळा बसस्थानकात सुरक्षाव्यवस्थेबाबत मोठ्या उणिवा कायम आहेत. आवारात सीसीटीव्ही यंत्रणा अस्तित्वात नाही. पोलिस चौकीदेखील बंद अवस्थेत आहे. ही पर्वणी साधत चोरटे सर्रासपणे प्रवाशांना लक्ष्य करत दागिने, रोकड लांबवत आहेत. त्यामुळे चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे.