फोटो : NSK26H32943
नंदुरबार : आरोग्य संवाद कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. योगिनी सपकाळे.
------------------
रघुवंशी नर्सिंगमध्ये मानसिक आरोगयावर मार्गदर्शन
‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद- जागरण आरोग्याचा’ जनजागृती उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
नंदुरबार, ता. १८ : ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमांतर्गत नंदुरबार तालुका विधायक समितीच्या श्रीमती विमलताई बटेसिंग रघुवंशी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये मानसिक आरोग्य विषयावर कार्यक्रम झाला. प्रा. योगिनी सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रा. अंजली तडवी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ‘आरोग्य शपथ’ दिली. तसेच, छत्रपती मल्टीस्पेशलिटी रुग्णालय येथे ग्लोबल हॅन्ड वॉशिंग दिवसअंतर्गत रुग्णांना व संबंधित रुग्णालयीन कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. हाताची स्वच्छता याबाबत माहिती दिली. विद्यार्थींनीनंसाठी स्तनाचा कर्करोग या विषयावर नर्सिंग महाविद्यालयात एक दिवसीय कार्यशाळा झाली. या वेळी यशवंत महाविद्यालय, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व नर्सिंग महाविद्यालयाच्या १४० हून अधिक सहभागी विद्यार्थिनींना स्तनाच्या कर्करोगाबद्दल माहिती देण्यात आली.
चतुर्थ सेमिस्टर बीएसस्सी नर्सिंगच्या भाग्यश्री चव्हाण, श्रेया गवारगुर, मुक्तेश्वरी गिरासे, निषिकेश वैद्य, विद्या पावरा, सौरभ मोरे, कविता वसावे, सावंत वळवी, लक्ष्मी वसावे, संदीप वसावे व लक्ष्मी पाडवी या विद्यार्थ्यांनी ‘स्तनाचा कर्करोग’ या विषयावर पथनाट्य सादर केले. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन स्तनाची स्व:तपासणीबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखविले. प्रा. भूषण ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका वंदना वळवी, ऐश्वर्या वळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.