मानसिक आरोग्य दिनानिमित्त वेबीनार

मानसिक आरोग्य दिनानिमित्त वेबीनार
Published on: 
ॲंकर भुसावळ परिसर पानासाठी BSW26B12159 भुसावळ : मानसिक आरोग्यदिनानिमित्त ऑनलाइन परिसंवादात सहभागी डॉ. प्राची प्रताप, आरती चौधरी आदी. --------- इतरांशी तुलना केल्यामुळे आयुष्यात दु:ख --- समुपदेशक आरती चौधरी : मानसिक आरोग्यदिनानिमित्त ऑनलाइन परिसंवाद सकाळ वृत्तसेवा भुसावळ, ता. ११ : सकारात्मक राहणे महत्त्वाचे आहे. तरीही मनात कधीतरी नकारात्मक भावना निर्माण झाल्यास स्वतःला दोषी न समजता भावनांचा स्वीकार करावा. समाजमाध्यमा(सोशल मीडिया)वरील इतरांच्या आयुष्याशी तुलना केल्याने अनेकदा स्वतःच्या आयुष्याबद्दल दुःखी होतो. मात्र, प्रत्येकाचा जीवनप्रवास वेगळा असतो. समाज माध्यमावर दिसणारे चित्र हे संपूर्ण आयुष्य नसून, त्यातील केवळ काही निवडक क्षण असतात. त्यामुळे आपल्या आनंदाचे व भावनिक स्वास्थ्याचे मोजमाप सोशल मीडियावरून करू नये, असे आवाहन समुपदेशक आरती चौधरी यांनी केले. येथील सक्षम कौन्सिलिंग सेंटर व इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे मानसिक आरोग्यदिनानिमित्त आयोजित ''मानसिक ताण व बाह्य सौंदर्य'' या विषयावरील परिसंवादात मार्गदर्शक म्हणून चौधरी बोलत होत्या. यात पुणे येथील त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्राची प्रताप यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, डॉ. सुवर्णा गाडेकर प्रमुख पाहुण्या होत्या. समुपदेशक आरती चौधरी यांनी मानसिक आरोग्याविषयी समाजात वाढत असलेल्या जागरूकतेबद्दल समाधान व्यक्त केले. गेल्या पाच वर्षांपासून सक्षम कौन्सिलींग सेंटरतर्फे आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्यदिनानिमित्त सातत्याने परिसंवाद आयोजित करण्यात येत असून, दरवर्षी सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. त्वचा-केसांवर परिणाम त्वचारोगतज्ज्ञ डॉ. प्राची प्रताप यांनी मानसिक ताणाचा त्वचा व केसांवर होणारा परिणाम शास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्ट केला. ताणतणावामुळे त्वचा व केसांशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात, याबाबत माहिती देत त्यांनी योग्य काळजी, ताण व्यवस्थापन व आवश्यकतेनुसार वैद्यकीय सल्ला घेण्याचे महत्त्व सांगितले. त्वचेवरील पांढरे डाग अर्थात कोड या विषयाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून योग्य माहिती व वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन केले. यांनीही घेतला सहभाग या परिसंवादात जळगाव येथील क्षमा फेगडे यांनी विषयाशी संबंधित अतिशय समर्पक प्रश्न विचारून चर्चेला अधिक माहितीपूर्ण व संवादात्मक स्वरूप दिले. भुसावळ, जळगाव, नाशिक व पुणे येथील अनेक नागरिक ऑनलाइन सहभागी होते. प्रश्नोत्तरांच्या सत्रात सहभागींच्या शंकांचे तज्ज्ञांनी समर्पक उत्तरे देऊन समाधान केले. मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे, ताणतणावाकडे सकारात्मक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहणे व मनाच्या आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्याची काळजी घेण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. योगिता वायकोळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. उर्मी ठक्कर यांनी झूम प्लॅटफॉर्मवरील तांत्रिक व्यवस्थापनासाठी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com