नगाव समुपदेशन शिबीर

नगाव समुपदेशन शिबीर
Published on: 
KPD26B13478 नगाव : समुपदेशन शिबिराचे उद्‌घाटन करताना प्रा. साजिद पटेल. शेजारी प्राचार्य डाॅ. एस. आर. पाटील, प्रा. शारदा मोरे आदी. --------- गंगामाई महाविद्यालयात मानसिक समुपदेशन शिबीर कापडणे, ता. १३ : नगाव (ता. धुळे) येथील गंगामाई एज्युकेशन ट्रस्ट संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाकडून ‘मानसिक व शारीरिक आरोग्य’ या विषयावर विशेष समुपदेशन व मार्गदर्शन शिबिर झाले. न्यू माइंड सेट व्यक्तिमत्व विकास व समुपदेशन केंद्राचे समुपदेशक प्रा. साजिद पटेल हे प्रमुख मार्गदर्शक होते. प्रा. डाॅ. शारदा मोरे अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य डाॅ. एस. आर. पाटील, प्रा. किशोर गिरासे, प्रा. आशिष राजपूत आदी उपस्थित होते. प्रा. पटेल म्हणाले, आजच्या धावपळीच्या जीवनात विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि समाजातील प्रत्येक व्यक्ती मानसिक तणाव, चिंता, नैराश्य, मोबाईलचा अतिरेक, भावनिक असंतुलन यांसारख्या समस्यांना सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत आपले मानसिक आरोग्य सक्षम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी नियमित व्यायाम, मेडिटेशन, सकस आणि उत्कृष्ट आहार, पुरेशी झोप आणि मोबाईलचा अतिरेक टाळणे यासारख्या बाबींकडे लक्ष देऊन आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. डॉ. शारदा मोरे म्हणाल्या, व्यसनमुक्त भारत निर्मितीसाठी तरुणांनी पुढे येऊन सहकार्य करावे. तरुण पिढी व्यसनांपासून दूर राहिल्यासच सशक्त समाज निर्माण होईल. विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. वीरेंद्र घरडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com