नाशिक- शहराच्या मध्यवस्तीतील एका व्यावसायिक संकुलाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात असलेल्या परप्रांतीय युवकाला अग्निशमन दल आणि गंगापूर पोलिसांना वाचविण्यात यश आले आहे. मानसिक ताणतणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले होते. पोलिसांनी युवकाचे समुपदेशन करीत आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले. योगेश मनोहरराम चौधरी (वय २८, रा. पाथर्डी फाटा, मूळ रा. राजस्थान) असे युवकाचे नाव आहे.