Nashik News: शासकीय रुग्णालयातील केस पेपरवर जातीचा उल्लेख! उल्लेख काढावा अशी अनिंसची मागणी

Case Paper
Case Paperesakal

Nashik News : शासकीय रुग्णालयात उपचारापूर्वी जो केसपेपर काढावा लागतो त्यावर रुग्णाच्या माहितीपुढे असलेला जातीचा उल्लेख काढावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केली आहे. (Mention of caste on case paper in government hospital Nashik News)

शासकीय दवाखान्यांमधून उपचारासाठी रूग्ण गेला असता त्याला प्रथम केस पेपर काढावा लागतो. या केस पेपरमध्ये रुग्णाला स्वतःची माहिती भरावी लागते. मात्र आता केस पेपरवर रुग्णाने त्याच्या जातीचा उल्लेख करावा लागत असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने निवेदन देत, जातीचा उल्लेख काढण्याची मागणी केली.

नाशिक जिल्ह्यातील एका शासकीय दवाखान्यात रुग्णाला त्याची ‘जात’ लिहावी लागते. त्याविषयी अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पण वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अतार्किक, अजब व उत्तर मिळाले.

काही विशिष्ट जातीच्या लोकांमध्ये विशिष्ट आजार असतात. त्यावर उपचार करण्यासाठी हा कॉलम असून शासनाकडूनच हा फॉरमॅट आला आहे, असे उत्तर आल्याचे अंनिस च्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Case Paper
Nashik Agriculture News : राज्यात 60 हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे उद्दिष्ट; 177 कोटींचा निधी खर्च

केसपेपरवर जातीचा उल्लेख म्हणजे जातभेदाला खतपाणी घालण्याचा असंवैधानिक प्रकार असल्याने केस पेपरवर जातीचा उल्लेख दर्शविणारा कॉलम तातडीने काढून टाकावा. रुग्णावर त्याची जात, धर्म, लिंग, वंश पाहून उपचार केले जाऊ नयेत.

अशी मागणी करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, नितीन बागूल, जिल्हा बुवाबाजी विरुद्ध संघर्ष समितीचे महेंद्र दातरंगे आदींनी ही मागणी केली.

Case Paper
Nashik Tehsildar Office : नवीन इमारत होणार, तरीही तहसिल कार्यालयाची डागडुजी! वर्षानुवर्षे पडला पायंडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com