
नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये पायाभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असताना दुसरीकडे अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेल्या मेट्रो निओला मात्र ‘रेड सिग्नल’ मिळाल्याचे वृत्त आहे. त्याऐवजी कॉम्पॅक्ट मेट्रोची चाचणी केली जाईल. त्या संदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्र सरकारला सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या आहेत.