Nashik Metro Project
sakal
नाशिक: टायरबेस मेट्रोचा नारळ फुटण्याची वेळ आली असताना महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व महामेट्रोने नव्याने वाहतूक सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या सूचनेनंतर तयार झालेल्या प्रकल्प अहवालाचे बुधवारी (ता. २१) मंत्रालयात सादरीकरण केले जाणार आहे. या सादरीकरणानंतर शहरात टायरबेस मेट्रो की निओ मेट्रो धावणार? यावर शिक्कामोर्तब होणार असून, वाढत्या नाशिकच्या वाढत्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय होणार आहे.