दुचाकी वाहनांसाठी एमएच ४१ सीसी नवीन मालिका सुरू, पसंती क्रमांकासाठी अर्जांचे आवाहन

दुचाकी वाहनांसाठी एमएच ४१ सीसी नवीन मालिका सुरू, पसंती क्रमांकासाठी अर्जांचे आवाहन
Published on: 
मालेगावला दुचाकी वाहनांसाठी एमएच ४१ सीसी नवीन मालिका सकाळ वृत्तसेवा मालेगाव, ता. ६ : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय, मालेगाव येथे दुचाकी वाहनांसाठी एमएच ४१ सीसी ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे. आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी १२ नोव्हेंबरला सकाळी अकरा ते दुपारी अडीच या वेळेत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. विजय शेळके यांनी केले आहे. आकर्षक नोंदणी क्रमांका साठीचे विहित नमुन्यातील अर्ज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपलब्ध आहेत. ज्या व्यक्तीच्या नावे वाहन खरेदी केले असेल त्याच व्यक्तीच्या नावाने अर्ज सादर करावा. अर्जासोबत फोटो ओळखपत्र, निवासी पुराव्यासाठी आधारकार्ड, विजबील, घरपट्टीची साक्षांकित प्रत, निवडणुक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड इत्यादीची साक्षांकीत प्रती जोडणे आवश्यक राहील. पसंतीच्या नोंदणी क्रमांक शुल्काची रक्कम राष्ट्रीयकृत किंवा शेड्युल्ड बँकेचे डिमांड ड्राफ्टद्वारे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, मालेगाव या नावाने भरणे आवश्यक आहे. सोबत पॅनकार्डची साक्षांकीत प्रत जोडावी. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलुन किंवा रद्द करता येणार नाही. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अर्जदारास कार्यालयीन कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी चार पर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहीत केलेल्या शुल्कापेक्षा जास्त रक्कमेचे डिमांड ड्राप्ट बंद पाकीटात सादर करावे. जो अर्जदार विहीत शुल्कापेक्षा अधिक रकमेचा डिमांड ड्राफ्ट सादर करेल त्यास सदर पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.