नाशिक- नाशिक शहराच्या पोलिस आयुक्तालयात एक महत्त्वपूर्ण भर पडली असून, नवीन ‘एमआयडीसी पोलिस ठाणे’ आता अधिकृतपणे कार्यान्वित होणार आहे. अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्यांच्या हद्दीचे विभाजन करून राज्याच्या गृह विभागाने या नवीन ठाण्यास मान्यता दिली. त्यामुळे शहरात आता पोलिस ठाण्यांची संख्या १५ झाली आहे.