सातपूर- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विविध संवर्गातील सुमारे ९०० पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत १० जुलै २०२५ रोजी राज्यभर लेखी परीक्षा होणार आहे. ही परीक्षा राज्यातील ८९ परीक्षा केंद्रांवर तीन सत्रांमध्ये घेतली जाणार असून, नाशिक शहरात ९ परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.