पान तीन ॲंकर
----------
सैन्यात नोकरीच्या आमिषाने फसवणूक
पाच जणांकडून उकळले १६ लाख ८५ हजार रुपये
-
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. १६ : भारतीय सैन्य दलात सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच जणांकडून १६ लाख ८५ हजार १४९ रुपये उकळल्याप्रकरणी तिघांविरुद्ध पिंपळनेर (ता. साक्री) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित कैलास मगन देसाई (रा. इदगाव पाडा, ता. साक्री) याला अटक केली.
अजय पांडव चौधरी (रा. भुवाकी, ता. साक्री) व त्यांच्या नातेवाइकांच्या मुलांना महार रेजिमेंट, महू (मध्य प्रदेश) येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून संशयित कैलास देसाई, राजू शंकर अहिरे (रा. वाखारी, ता. देवळा, जि. नाशिक) आणि नाना शिवाजी बेंद्रे (रा. देवळा, ता. देवळा, जि. नाशिक) याने दाखविले.
यात ५ एप्रिल ते ११ सप्टेंबर २०२५ या कालावधीत अजय चौधरी यांच्यासह वसंत रघुनाथ मालुसरे, भारत यशवंत सूर्यवंशी, चतुर सत्यपाल मालुसरे आणि अर्जुन चौरे यांच्याकडून वेळोवेळी रक्कम घेतली. मात्र, नोकरी न लावता फसवणूक केली. याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीनुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कैलास देसाई याला १५ ऑक्टोबरच्या रात्री अटक करण्यात आली.