Milk Adulteration : उकळताच दूध रबरासारखे ताणले; भेसळीच्या संशयाने खळबळ

मालेगाव तालुक्यातील रावळगावमधील प्रकार; कोजागिरीच्या प्रसादासाठी आणलेल्या दुधाचा व्हिडिओ व्हायरल, तपासणी करून कारवाईची मागणी.
Shocking Incident on Kojagari Pornima: Milk Stretches Like Rubber in Unique Phenomenon

Shocking Incident on Kojagari Pornima: Milk Stretches Like Rubber in Unique Phenomenon

sakal

Updated on: 

सटाणा - कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना प्रसाद म्हणून देण्यासाठी आणलेले दूध उकळताच रबरासारखे ताणले जाऊ लागल्याचा धक्कादायक प्रकार मालेगाव तालुक्यातील रावळगाव येथे समोर आला आहे. गावातील खासगी डेअरीतून खरेदी केलेल्या दुधाच्या या संशयास्पद स्थितीचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे दुधाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित दुधाची तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com