फोटो क्र ः NSK26H31613
जळगाव ः माइंड स्प्रिंग-२०२६’चे उद्घाटन करतेप्रसंगी जिल्हाधिकारी रोहन घुगे शेजारी यशवंत शितोळे, भालचंद्र पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले
–––
फोटो क्र ः NSK26H31614
जळगाव ः माइंड स्प्रिंग-२०२६’चे प्रदर्शनात लावलेले स्टॉल.
–––
ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी, कौशल्याचा वापर उद्योजकतेसाठी
(उपशीर्षक)
जिल्हाधिकारी रोहन घुगे ः माइंड स्प्रिंग-२०२६’चे उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ७ ः ज्ञानाचा वापर कौशल्यासाठी आणि कौशल्याचा वापर व्यवसाय व उद्योजकतेसाठी केला, तर यश निश्चित मिळते, असा संदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना दिला.
खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटर आणि हायर अँड टेक्निकल एज्युकेशन करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘माइंड स्प्रिंग-२०२६ एक्झिबिशन-कम-सेल’चे उद्घाटन आज मु. जे. महाविद्यालयाच्या बास्केटबॉल कोर्टवर झाले. प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रोहन घुगे आणि करियर कट्टाचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते झाले. पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष तथा केसीईचे मॅनेजमेंट कौन्सिल सदस्य भालचंद्र पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी केसीईचे सचिव प्रमोद पाटील, ॲड. प्रवीणचंद्र जंगले, डॉ. डी. टी. पाटील, कान्ह ललित कला केंद्राचे संचालक शशिकांत वडोदकर यांच्यासह केसीईच्या विविध शाखांचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. ३ शाळांचे २१ स्टॉल्स, केसीईच्या अंतर्गत येणारे मू. जे. महाविद्यालय, आयएमआर कॉलेज, इंजिनिअरिंग, बी एड कॉलेज, विधी महाविद्यालय यांचे एकूण १४० संघ यांनी सहभाग नोंदवला.
जिल्हाधिकारी घुगे यांनी विद्यार्थ्यांना आपल्या प्रकल्पांचे प्रोजेक्ट शोकेस करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळत आहे. या संधीमुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढेल आणि भविष्यात या संधीचे सोने करून यशस्वी उद्योजक म्हणून पुढे येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाधिकारींनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना विशेष भेट देत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला, नवोन्मेषाला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणे. तसेच त्यांच्या कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळवून देणे हा या भेटीमागील मुख्य हेतू असल्याचे स्पष्ट केले.
तर खानदेशच्या मातीतून गगनभरारी घेणारे उद्योजक या उपक्रमाच्या माध्यमातून घडतील, असा विश्वास यशवंत शितोळे त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक व्यक्ती आपल्या अनुभवातून काहीतरी शिकवण्यासाठी आणि देण्यासाठी आलेली असते. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना योग्य दिशा आणि संधी मिळाल्यास भविष्यातील उद्योजक निश्चितपणे घडतील, असे त्यांनी सांगितले.