नशामुक्तीचा संदेश देत जळगावात मिनी मॅरेथॉन उत्साहात

नशामुक्तीचा संदेश देत जळगावात मिनी मॅरेथॉन उत्साहात
Published on: 
NSK26H34170 जळगाव'': नशामुक्त भारत अभियानांतर्गत जळगावात आयोजित मिनी मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करताना मान्यवर. नशामुक्तीचा संदेश देत मिनी मॅरेथॉन उत्साहात शालेय व खुल्या गटातील शेकडो धावपटूंचा सहभाग; विजेत्यांचा गौरव सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : युवकांनी व्यसनांपासून दूर राहून आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, तसेच व्यायाम आणि क्रीडाप्रकारांना दैनंदिन जीवनात महत्त्व द्यावे, या उद्देशाने नशामुक्त भारत अभियानांतर्गत आयोजित मिनी मॅरेथॉनला जळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ''नशामुक्त युवा – विकसित भारत'' हा संदेश देत शेकडो धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. शालेय आणि खुल्या गटातील मुलगे, मुली, पुरुष व महिला धावपटूंनी धावण्याच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा जागर केला. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्स, भारत सरकार, भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई), फिट इंडिया चळवळ आणि खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने या मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी के.सी.ई. सोसायटीचे सहसचिव ॲड. प्रवीणचंद्र जंगले अध्यक्षस्थानी होते. भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे असिस्टंट डायरेक्टर माधव कांबळे, स्वामी समर्थ शैक्षणिक संस्थेचे संस्थापक मनोज पाटील, अभिषेक चौरे, उपनिरीक्षक सचिन रनशेवरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी के.सी.ई. सोसायटी व्यवस्थापन मंडळाचे सदस्य भालचंद्र पाटील, उपप्राचार्या प्रा. राजश्री महाजन, मुख्याध्यापिका सुषमा कंची उपस्थित होत्या. विजेते खेळाडू शालेय गट (१३ ते १६ वर्षे) मुले : प्रथम कार्तिक दीपक हटकर, द्वितीय कुणाल बाळू महाले, तृतीय नैतिक पद्माकर चव्हाण मुली : प्रथम सेजल कमलाकर मोरे, द्वितीय तेजस्विनी ताराचंद ढाके, तृतीय गायत्री ज्ञानेश्वर पाटील खुला गट (१७ वर्षे व त्यावरील) पुरुष : प्रथम अजय तल्लिम तडवी, द्वितीय योगेश प्रवीण पाटील, तृतीय अजय आपसिंग वसावे, महिला : प्रथम गायत्री योगेश सोनवणे, द्वितीय गायत्री कृष्णा बोरसे, तृतीय रोहिणी नरेंद्र बिर्‍हाडे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकलव्य क्रीडा संकुलातील डॉ. रणजीत पाटील, चंद्रलेखा जगताप, नीलेश खडके, वसंत सोनवणे, योगेश चव्हाण आदींनी परिश्रम घेतले. डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.