esakal | लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!
sakal

बोलून बातमी शोधा

dada bhuse son wedding

लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मालेगाव (जि.नाशिक) : कृषीमंत्री दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार आणि ठाण्याचे खासदार राजन विचारे यांची कन्या लतीशा यांचा विवाह सोमवार 26 एप्रिलला झाला.या लग्नाबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली होती. पण अशातही कृषिमंत्री आपल्या कर्तव्याला विसरले नाही. लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून ते लगेचच ऑन फिल्ड रवाना झाले.

एकनाथ शिंदें उपस्थित; ऑनलाईन शुभेच्छा

अन्न पुरवठा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी या विवाह सोहळ्यात ऑनलाईन सहभागी होऊन आविष्कार आणि लतीशा यांना आशीर्वाद दिला. राज्यातील काही आमदार, खासदार यांच्या गाड्या गेटमधून सोडण्यात आल्या. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून वधू वरांना शुभ आशीर्वाद दिला.

loading image