अतिवृष्टीमुळे नुकसान, पिकांचे तत्काळ पंचनामे करा : मंत्री भुसे

Minister Dada Bhuse inspecting the damaged crops
Minister Dada Bhuse inspecting the damaged cropsesakal

मालेगाव (जि. नाशिक) : अतिवृष्टीमुळे ज्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल शासनस्तरावर सादर करावा, अशा सूचना मंत्री दादा भुसे यांनी दिल्या.

तालुक्यातील पोहाणे व कजवाडे येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी श्री. भुसे यांनी केली. त्या वेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. (Minister Dada Bhuse statement on heavy rain crop damage Nashik Latest Marathi News)

Minister Dada Bhuse inspecting the damaged crops
75 किमी अंतर सायकलने पार करत कल्याणकर तरुणाची अनोखी देशभक्ती

श्री. भुसे म्हणाले, की शेतकऱ्यांना एनडीआरच्या नियमाप्रमाणे कोरडवाहू शेतीला सहा हजार ८०० रुपये नुकसानभरपाई देण्यात येत होती. परंतु आता नुकसानभरपाई दुप्पटीने म्हणजेच १३ हजार ६०० रुपये मिळणार आहे.

या अनुषंगाने शेतकरीहिताचा निर्णय शासनाने घेतला आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या हिताचे गरीब, कष्टकरी, मजूर व समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कजवाडे परिसरात दोन ते तीन दिवसांमध्ये सततच्या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली आहेत, अशा पिकांचेही तत्काळ पंचमाने करावेत.

Minister Dada Bhuse inspecting the damaged crops
MVP Election : येवल्यासाठी प्रगती पॅनेलकडून माणिकराव शिंदेंचे नाव जाहीर

परिसरातील वीज, पाणी आदी समस्याही लवकरच सोडविल्या जातील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले तलाव, पूल, रस्ते वाहून गेले असून, ते दुरुस्तीचे काम सुरू करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना या वेळी श्री. भुसे यांनी दिल्या.

या वेळी माजी उपमहापौर नीलेश आहेर, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अली इनामदार, प्रमोद पाटील, मनोहर बच्छाव आदींसह पोहाणे-कजवाडे परिसतील ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com