नाशिक- लाडक्या बहिणींना दोन हजार १०० रुपये देऊ, असे कुणीही म्हटले नाही, असे वक्तव्य करून अडचणीत आलेले मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आता जलजीवन मिशन योजना ‘फेल’ झाल्याचा दावा केला आहे. जलजीवन मिशन योजना कुणी बनविली, हे माहिती नाही; पण योजना राबविताना नियमांचे पालन केले गेलेले नाही, असे म्हणत त्यांनी सरकारला ‘घरचा आहेर’ दिला आहे.