येवला- शिक्षण क्षेत्राविषयी समाजाचा बदलता दृष्टिकोन सकारात्मक होणे गरजेचे आहे. याशिवाय, शिक्षणाचे स्वरूप व दर्जा वाढीसाठी आगामी शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १०० शाळांना मंत्री, राज्यमंत्री, लोकप्रतिनिधी तसेच विविध अधिकारी भेट देणार आहेत. मुलांची उपस्थिती व गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.