Crime
sakal
नाशिक : दुसऱ्या मुलांशी बोलते, या संशयातून अल्पवयीन मैत्रिणीच्या मानेवर चाकूने वार करून तिचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर संशयित आरोपीने मृतदेह कारमधून नाशिकपर्यंत आणून वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सारूळ परिसरात फेकून दिला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल असून, फरारी संशयितांना सातपूर पोलिसांनी भद्रकाली पोलिसांच्या मदतीने द्वारका परिसरातून अटक केली.