अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी
Published on: 
अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी --- जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १२ : लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला गर्भवती करणाऱ्या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी ठरवत १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि तीन हजारांचा दंड ठोठावला. तसेच, पीडितेला एक महिन्याच्या आत एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. विवेक भाऊसाहेब निकम (वय १९, रा. शिवाजी चौक, भारतनगर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जुलै २०१७ ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत मुंबई नाका पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला होता. आरोपी विवेक निकम याने १५ वर्षे सात महिने वय असलेल्या अल्पवयीन पीडित मुलीस फूस लावून लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडितेच्या पालकांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोक्सोसह अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. आर. एन. पांढरे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद, साक्षीदार, पंच आणि तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेले सबळ पुरावे ग्राह्य धरत आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व तीन हजारांचा दंड सुनावला. पीडितेला एक लाखांची भरपाई एका महिन्यात न दिल्यास आरोपीला एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास भोगावा लागेल, असे आदेशात स्पष्ट केले आहे. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक पंकज सोनवणे यांनी या गुन्ह्याचा तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. भानुप्रिया पेठकर यांनी बाजू मांडली. अभियोग कक्षाचे प्रभारी अधिकारी सुदाम सांगळे, महिला पोलिस हवालदार रंजना गायकवाड, पैरवी महिला पोलिस अंमलदार कविता महाले यांनी पाठपुरावा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com