Nashik News : कसबे सुकेणेत शेतीला पुदिना पिकाचा पर्याय; पुदिना पिकाचे शेकडो एकरवर क्षेत्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A blooming mint farm in Pankaj Bhandare's farm.

Nashik News : कसबे सुकेणेत शेतीला पुदिना पिकाचा पर्याय; पुदिना पिकाचे शेकडो एकरवर क्षेत्र!

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : येथील शेतकऱ्यांकडून परिसरात पारंपारिक पिकाऐवजी पुदिना या पीक लागवडीवर भर दिला जात आहे.

पुदिना पिकासाठी उपलब्ध असलेली बाजारपेठ व परिसरात मिळत असलेले हक्काचे मजूर यामुळे शेतकऱ्यांचा पुदिना पिकावरचा कल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (Mint crop alternative to agriculture in Kasbe Sukene Hundreds of acres of mint Nashik News)

पुदिना हे पीक सरासरी तीन ते चार वर्ष मोठ्या प्रमाणात उत्पादन देते. वर्षात सरासरी चार ते पाच कापण्या या पिकाच्या केल्या जात असून पिकाला सरासरी दोन ते अडीच रुपये जुडीप्रमाणे भाव मिळतो आहे.

शिवाय, परिसरातील हवामान या पिकाला अनुकूल असून रासायनिक खते व कीटकनाशकांचे प्रमाणही कमी लागते, ठिबक किंवा तुषार सिंचनावर हे पीक उत्तम दर्जाचे येत असल्याने शेतकरी सध्या हक्काचे पीक म्हणून या पिकाकडे बघत आहे.

वर्षातील किमान पाच कापण्यांपैकी तीन कापण्यांना बाजारपेठत भाव मिळाला तरी शेतकऱ्याचा उत्पन्न व खर्च यात ताळमेळ बसून नफ्याचे प्रमाण वाढते. शिवाय, कोणत्याही वातावरणात हे पीक उत्तम येत असल्याने इतर पिकांपेक्षा शेतकऱ्यांच्या दृष्टीने या पिकाची डोकेदुखी कमी‌ होते.

हेही वाचा : सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

हेही वाचा: Jindal Fire Accident : जिंदाल घटनेचा उच्चस्तरीय समितीकडून आढावा

खर्च कमी मात्र, नफा चांगला यामुळे कसबे सुकेणे व मौजे सुकेणे परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी या पिकाकडे वळले असून शेकडो एकरवर सध्या पुदिना लागवड होताना दिसत आहे.

शेतातच व्यापारी येत असल्याने व काही मजूर फक्त पुदिना पिकाचेच काम करत असल्याने शेतकऱ्यांना हक्काच्या बाजारपेठेबरोबरच हक्काचे मजूरही मिळत आहे. येत्या, काही काळात पुदिना पिकाचे क्षेत्र आणखी वाढेल असे चित्र दिसत आहे.

"अनेक वर्ष द्राक्ष शेतीसह इतर प्रकारची शेती करून बघितली. मात्र, उत्पादन व खर्च यांचा ताळमेळ बसला नाही. इतर पिकांपेक्षा पुदिना शेती वरदान ठरत आहे."

--पंकज भंडारे, पुदिना उत्पादक शेतकरी

हेही वाचा: Shubhangi Patil Profile : ठाकरे गटाचा पाठिंबा मिळालेल्या शुभांगी पाटील कोण?