Nashik Crime: दूध संघाच्या जागेचा अपहार! 9 संचालकांसह सनदी लेखापालाविरोधात गुन्हा दाखल

Land Fraud
Land Fraudesakal

Nashik Crime : वडाळानाका येथील नाशिक जिल्हा सरकारी दूध उत्पादक संघाची माळेगाव (ता. सिन्नर) औद्योगिक वसाहतीत असलेल्या जागेच्या विक्रीतून मिळालेल्या रकमेपैकी सुमारे १९ लाख ५८ हजार रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी नऊ संचालकांसह सनदी लेखापालाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Misappropriation of milk union place Case filed against Chartered Accountant along with 9 Directors Nashik Crime)

हौशीराम मनोहर घोटेकर, विनोद गुलाबराव चव्हाण, विजय गणपत कोतवाल, दिलीप भिका शेवाळे, नामदेव परा, भाऊराव देवराम पाटील, छाया अरुण काळे, कल्पना सतीश कुऱ्हे, वसंत कोंडाजी सोनवणे, जयेश देसले अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

संतोष सदाशिव वाघचौरे (रा. नाशिक) यांच्या फिर्यादीनुसार, वडाळा नाका येथे नाशिक जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित या संस्थेचे कार्यालय आहे. या दूध उत्पादक संघाची माळेगाव (ता. सिन्नर) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये जागा आहे.

Land Fraud
Crime News: ५१ लाख जमा केले मात्र व्यापाऱ्याकडून साखर काही मिळालीच नाही; गुन्हा दाखल

सदरची जागा संस्थेला विकायची होती. त्यासाठी वर्तमानपत्रात जागा विक्रीची जाहीर निविदा न देता संचालक मंडळातील नऊ संचालक व सनदी लेखापाल यांनी संगनमताने जागा विक्री केली. यामुळे जागेला व्यवहारातून जी अधिकची रक्कम मिळाली असती ती मिळू शकली नाही.

तसेच जागा विक्रीतून प्राप्त झालेल्या ४९ लाख ७६ हजार ४५१ रुपयांपैकी १९ लाख ५८ हजार ५४० रुपयांची रक्कम संशयितांनी स्वत:च्या फायद्यासाठी वापरून संस्थेची फसवणूक करीत अपहार केला.

या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ गेंगजे करीत आहेत.

Land Fraud
Mumbai Crime: महिलेच्या घरातुन दोन पिस्तूल आणि काडतुसे जप्त!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com