बेपत्ता मुलाचा 24 तासात शोध; देवळा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

Police Inspector Dilip Landge and others while handing over the missing child to the family.
Police Inspector Dilip Landge and others while handing over the missing child to the family.esakal

देवळा (जि. नाशिक) : घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी २४ तासांच्या आत शोध लावला. या मुलास सुखरूप त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केल्याने पोलिसांचे कौतूक होत आहे.

तालुक्यातील वासोळपाडे (फुलेनगर) येथील १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा सोमवारी (ता. ५) सकाळी साडेअकराच्या दरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेला. आई- वडील व नातेवाईकांनी परिसरात चार- पाच दिवस शोध घेतला. मात्र, त्यांना मुलगा सापडला नसल्याने त्यांची काळजी वाढत गेली. अखेर रविवारी (ता. ११) दुपारी आई- वडीलांनी देवळा पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. (missing child found within 24 hours by Deola police Nashik Latest Marathi News)

पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ व त्यांच्या पथकाने माहिती व दिलेल्या वर्णनावरून मुलाच्या शोधासाठी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. दिवसभर मुलाच्या शोधात असताना फिर्यादीत नमूद केलेल्या वर्णनाचा मुलगा सोमवारी (ता. १२) रात्री दहाच्या सुमारास नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात आढळून आल्याची माहिती मिळाली.

श्री. शिरसाठ यांनी नाशिकचे सहकारी पोलिस समाधान शिंदे यांना याबाबत कल्पना देत मुलाचा शोध घेण्यास सांगितले. शिंदे यांनी भरपावसात त्याचा शोध घेतला असता सदर मुलगा एका दुकानाबाहेर बसलेला आढळून आला.

विचारपूस केली असता तो घाबरलेला होता. बेपत्ता मुलगा हाच असल्याची खात्री पटविण्यासाठी समाधान शिंदे यांनी त्याचा फोटो सहाय्यक पोलिस निरीक्षक शिरसाठ यांना पाठवला. आई- वडीलांनी हा आपलाच मुलगा असल्याचे सांगिल्यानंतर त्याला देवळा पोलिस ठाण्यात आणले गेले.

Police Inspector Dilip Landge and others while handing over the missing child to the family.
Crime Update : मिठाईत झुरळ टाकून उकळली खंडणी; CCTVमुळे पोलखोल

पोलिस निरीक्षक दिलीप लांडगे यांनी त्याचे योग्य समुपदेशन करून कुटुंबियांच्या ताब्यात दिले. मुलगा सुखरूप परतल्याने आई- वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. पोलिसांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांना काहीच सुचत नव्हते.

याकामी पोलिस उपनिरीक्षक विक्रांत कचरे, पोलिस नाईक ज्योती गोसावी यांचे सहकार्य लाभले. बेपत्ता मुलाचा अवघ्या चोवीस तासात शोध घेतल्याने पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, कळवणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड यांनी देवळा पोलिसांचे अभिनंदन केले.

Police Inspector Dilip Landge and others while handing over the missing child to the family.
Crime Update : मुले पळविणारे समजून ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com