Crime
sakal
शहरातील नामांकित महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली युवती अचानक बेपत्ता झाली. सातपूर पोलिसांत बेपत्ताची नोंद करण्यात आली. पोलिसांनी महाविद्यालयासह तिच्या मैत्रिणींकडे चौकशी करूनही हाती काहीच लागले नाही. अखेर सातपूर पोलिस ठाण्यातील तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक भावना महाजन यांनी कसून शोध घेत त्या युवतीला पालकांच्या स्वाधीन केले.