नांदगाव :- पीक पाहणीपासून २२ हजार खातेदार वंचित; गट नंबरच अॅपवर नसल्याची तक्रार ​दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नोंदणीचा पेच; आमदार कांदेंची गट नंबर उपलब्ध करून देण्याची मागणी

नांदगाव :- पीक पाहणीपासून २२ हजार खातेदार वंचित; गट नंबरच अॅपवर नसल्याची तक्रार ​दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर नोंदणीचा पेच; आमदार कांदेंची गट नंबर उपलब्ध करून देण्याची मागणी
Published on: 
अँकर --- पीक पाहणीपासून २२ हजार खातेदार वंचित ६७.७ टक्के नोंदणी पूर्ण; गट नंबर ॲपवर दिसत नसल्याने तांत्रिक अडथळे सकाळ वृत्तसेवा नांदगाव, ता. ६ ः तालुक्यात दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना, पीक पाहणीची नोंदणी केवळ ६७.७ टक्क्यांवरच थडकली आहे. एकूण ६९ हजार ४४५ खातेदारांपैकी केवळ ४६ हजार ९९९ खातेदारांचीच पीकपाहणी पूर्ण झाली असून, अजूनही तब्बल २२ हजार ४४६ खातेदारांची (३२.३ टक्के) नोंदणी अद्याप कागदावरच बाकी आहे. त्यातच अनेक गावांतील शेतजमिनींचे गट नंबर पीक पाहणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲपवर उपलब्ध होत नसल्याची गंभीर तक्रार पुढे आल्याने, या प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा पेच अधिकच बिकट झाला आहे. ​या गंभीर समस्येची दखल घेत आमदार सुहास कांदे यांनी तहसीलदारांना पत्र लिहून पीक पाहणीच्या नोंदीपासून वंचित राहता कामा नये यासाठी उपाययोजनांना चालना देण्याबाबत निर्देश दिले आहेत. दुष्काळग्रस्त नांदगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पीक पाहणीसाठी नियुक्त केलेल्या सहायकांच्या ॲपवर संबंधित जमिनींचे गट नंबर दिसत नसल्याने ऑनलाइन नोंदणी करणे अशक्य झाले असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. पावसाने पाठ दिल्याने तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती उद्‍भवली असून, खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा बिकट परिस्थितीत शासनाकडून मिळणारी संभाव्य दुष्काळी मदत, पीक नुकसानभरपाई आणि इतर शासकीय लाभांसाठी पीक पाहणीच्या नोंदी ग्राह्य धरल्या जातात. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेपासून लांब राहावे लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ​ज्या शेतकऱ्यांच्या जमिनींचे गट नंबर ॲपवर दिसत नाहीत, त्यांची स्वतंत्र यादी तयार करून तातडीने नोंदी अद्ययावत कराव्यात आणि पात्र शेतकऱ्यांसाठी विशेष मोहीम राबवावी, अशी आक्रमक मागणी आमदार कांदेंनी केली आहे. केवळ तांत्रिक अडचणीमुळे एकही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. --- कोट आधीच दुष्काळामुळे बळीराजा चिंतेत आहे आणि काही ठिकाणी ॲपमध्ये अडचण येत असल्याचे लक्षात आल्यावर ॲपमधील तांत्रिक अडचण त्वरित दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. - सुहास कांदे, आमदार पीक पाहणीची नोंद करण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केले; मात्र ॲपवर आमच्या शेतजमिनीचा गट नंबरच दिसत नसल्याने पीक पाहणीची नोंद करता आली नाही. पीकविमा भरपाईपासून आम्ही वंचित राहण्याची भीती आहे. - रामहरी बनगर वंचित शेतकरी, बाणगाव बुद्रुक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com