Nashik : अक्कलकुवा येथील बेपत्ता मुली सापडल्या मनमाडला

Manmad Security force officials, personnel including two minor girls who went missing.
Manmad Security force officials, personnel including two minor girls who went missing.esakal
Updated on

मनमाड (जि. नाशिक) : कबड्डी खेळाडू असलेल्या अक्कलकुवा येथील दोन अल्पवयीन मुली स्पर्धेसाठी दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथे आल्या होत्या. स्पर्धा आटोपून परतीच्या प्रवासात त्या पिंपळनेर येथे बेपत्ता झाल्या होत्या. काही तासानंतर त्या मनमाड रेल्वे स्थानकावर घाबरलेल्या अवस्थेतआढळून आल्या. रेल्वे सुरक्षा बल पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना शिक्षक व पिंपळनेर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (Missing girls from Akkalkuwa found in Manmad Nashik Latest Marathi News)

Manmad Security force officials, personnel including two minor girls who went missing.
गणेशोत्सवात कोटीची उलाढाल; 2 वर्षात झालेल्या नुकसानीची भरपाई

येथील रेल्वेच्या सुरक्षा बलाचे साहाय्यक उपनिरीक्षक गणेश कुमरावत, सहाय्यक उपनिरीक्षक साहेबराव ठाकरे रात्रीच्या सुमारास मनमाड रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना फलाटावर संशयास्पद अवस्थेत दोन अल्पवयीन मुली फिरताना दिसून आल्या. त्यांना विचारणा केली असता त्या अक्कलकुवा (नंदुरबार) नवोदय विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत असल्याचे समोर आले.

७ सप्टेंबरला या मुली शिक्षकांच्या टीमसह खेडगावच्या जवाहर नवोदय विद्यालयात क्रीडा स्पर्धेसाठी आल्या होत्या. स्पर्धा आटोपून सर्वजण बसने नंदुरबारला जात होते. रस्त्यात पिंपळनेर येथे दोन्ही मुली शौचालयाच्या बहाण्याने बसमधून उतरल्या आणि शिक्षकांना न सांगता नाशिकला येऊन रेल्वेने मनमाडला आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Manmad Security force officials, personnel including two minor girls who went missing.
Crime : गणेशवाडीतील मंडई होतेय आता चोरट्यांचे ‘लक्ष्य’

मुलींनी नाव, पत्ता सांगितल्यावरून एक मुलगी सुरत, तर एक तळोदा (नंदुरबार) येथील आहे. एकीने वडिलांचा मोबाईल क्रमांक दिल्यानंतर पोलिसांनी पालकांशी संपर्क साधला. मुली हरवल्याची तक्रार शिक्षकांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात केल्याचे पालकांनी सांगितले.

रेल्वे सुरक्षा बलाचे सहाय्यक उपनिरीक्षक गणेश कुमरावत, साहेबराव ठाकरे यांनी मुख्याध्यापक जी. पी. म्हस्के यांना माहिती दिल्यानंतर पिंपळनेरचे पोलिस उपनिरीक्षक बी. एम. मालचे, महिला पोलिस हवालदार व्ही. बी. निकुंभ व शिक्षकाच्या ताब्यात या मुलींना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com