टुडेची मुख्य-बापरे..जिल्‍ह्‍यातुन १५ हजार ८६२ जणांचे अपहरण!

टुडेची मुख्य-बापरे..जिल्‍ह्‍यातुन १५ हजार ८६२ जणांचे अपहरण!
Published on: 
मेनफिचर टुडे पान एकसाठी -------- (सूचना : ग्राफीक्स करावे, संग्रहित चित्र वापरावे) ---- बापरे, सात वर्षांतच १५ हजार ८६२ जण बेपत्ता! ----- तपासात खाकीची दमछाक; २० दिवसांत पावणेतीनशे व्यक्तींचा लागला शोध सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : शहरासह जिल्ह्यातील ३५ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून बेपत्ता होणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वर्षाला किमान एक हजारावर महिला, तर आठशेहून अधिक पुरुष बेपत्ता झाले आहेत. एकंदरीत गेल्या सात वर्षांत जिल्ह्यातून १५ हजार ८६२ स्त्री-पुरुष बेपत्ता झाले होते. याव्यतिरीक्त २४२ मुलं व एक हजार ४८६ मुलींचा समावेश होता. पोलिस दलाने प्रत्येक वर्षी हरविलेल्या प्रकरणात सरासरी ९९ टक्के बेपत्तांचा शोध लावून त्यांच्या कुटूंबीयांत परत आणले आहे. ताण-ताणाव, अपेक्षा भंग, समाजाचा दबाव, कुटूंबाच्या अपेक्षा अशा विविध कारणांसाठी महिला, तरुणी, पुरुष असो की, मुले घर सोडून बेपत्ता होतात. जगण्याचा संघर्ष पशु-पक्षी असोत की, मानव, प्रत्येकाच्या पाचवीलाच पुजला आहे. मग या संघर्षाला तोंड देऊन समस्या सोडवायच्या की, कुटूंबच सोडायचं? हे व्यक्तिपरत्वे भिन्न आव्हान असू शकते. पृथ्वीवर जो, जन्माला आला त्याच्या नशिबी संघर्ष आहेच. कुणाचा शारीरिक तर कुणाचा मानसिक संघर्ष सुरुच असतो. कौटुंबिक कलह, वादविवाद असोत की, विद्यार्थीदशेत पदरी आलेले अपयश, याचा सामना न करता कुटूंब सोडून निघुन जाण्याचे विचार प्रत्येकाच्याच मनात येतात. मात्र, यावर खरा विजय मिळवायचा असेल तर, त्या प्रश्नांचा, उदभवणाऱ्या समस्यांचा सामना करणे हाच ऐकमेव मार्ग आहे. उद् भवणारे प्रश्न व समस्या घर सोडून निघून जाण्याने कधीच संपत नसतात. उलटपक्षी समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते. असे असताना सर्वाधिक घर सोडणाऱ्यांमध्ये कौटुंबिक कलह, कुटूंबीयांशी वाद, पालकांचा धाक असे कारणे समोर येतात. प्रत्येक वर्षाला किमान एक हजार २००वर महिला बेपत्ता होतात, तर साडेआठशे पुरुष बेपत्ता होतात. टोकाच्या निर्णयाची भीती कौटुंबिक कलहातून घर सोडून गेलेल्यांत सर्वच प्रकरणांत कुटूंबीयांना संबंधिताने टोकाचे पाऊल तर उचलले नसेल ना, याची भीती लागून असते. काही प्रकरणांत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणारेही काही कमी नाहीत. अशा प्रकरणांत जाणारा निघून जातो, पश्चात कुटूंबीय आयुष्यभर स्वतःला दुषणं देत जगते. प्रेम प्रकरणांचा शिरकाव साधारणपणे १८ ते २५ वयोगटातील तरुण मुली बेपत्ता झाली की, तिचं प्रेम प्रकरण असावे, असा समज होतो. आता मात्र, काळ पूर्णतः बदलला असून, प्रेम प्रकरणाच्या कारणाने घर सोडणाऱ्यांमध्ये विवाहित महिलांचा समावेश ७० टक्क्यांच्या जवळपास आहेत. अगदी दोन-तीन आपत्ये सोडून महिला नव्या जोडीदारासोबत निघून जायलाही मागेपुढे पाहत नाहीत. क्वचितच १२ टक्के प्रकरणांत सासरचा जाच, तर १७ टक्के प्रकरणे कौटुंबिक कलहाची समोर आली आहेत. ------------ बेपत्ता व्यक्ती.. दृष्टीक्षेपात वर्ष------महिला--सापडलेल्या---बेपत्ताच--- पुरुष--- सापडलेले--बेपत्ताच २०२०---९४६-----९१२--------३४-------५०७----४६१-----४६ २०२१---११६९---११३४-------३५--------७०६----६४१-----६५ २०२२---१२४२---१२१२-------३०-------७८१-----७०३-----७८ २०२३---१४०८---१३६४-------४४-------८३०-----७६९------६१ २०२४---१४६७---१४१३-------५४-------८२६-----७२६-----१०० २०२५---१५१०---१४३९------७१--------८२९-----७२३-----१०६ २०२६---१२१६---१०१९-----१९७-------६९७------५१२-----१८४ -------- एकूण (महिला/पुरुष) बेपत्ता : ८,९५८ सापडलेले : ८,४९३ अद्याप बेपत्ता : ४६५ ---------------- वर्ष---- बेपत्ता मुले---सापडलेले---बेपत्ताच----मुली----सापडलेल्या--बेपत्ताच २०२०--३१---------३०--------०१-------१४९---१४९-------०० २०२१---३०--------३०--------००-------१७९---१७८--------०१ २०२२---३५-------३४----------०१-------१७०----१६९-------०१ २०२३---३४-------३४---------००--------२१०---२०८-------०२ २०२४---४१-------४०----------०१-------२६६---२५६-------१० २०२५---३४-------३४---------००--------२७३---२५०-------२३ २०२६---३७-------३४---------०३--------२३९----२११-------२८ --- एकूण---२४२-----२३६--------०६-------१४८६----१४२१-----६५ --------- यंत्रणेची दमछाक कुठल्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीतून कोणी बेपत्ता झाले, अन मिळून येत नसेल तर अगोदर अनोळखी मृतदेहांचा शोध घेतला जातो. हा नियम पन्नाशी ओलांडलेल्यांसाठी सरासरी लावला जातो. मात्र, अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल होऊन अधिकाऱ्यांनाच तपास करावा लागतो. त्यात तांत्रिक माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, प्रेम प्रकरण, शाळा महाविद्यालयांतून माहिती संकलीत करून बेपत्ता मुलीचा शोध घेतला जातो. कौटुंबिक अत्याचार, ताणतणावाची माहिती संकलीत केल्यावर त्याआधारे कारण समोर आल्यावर शोधमोहीम राबवावी लागते. ----- (चौकट) आता प्रत्येक बेपत्ता झाला अपहरण पूर्वी केवळ १८ वर्षांआतील मुले-मुलींच्या बाबतीत हरवल्याची तक्रार दिली की, अपहरणाचा गुन्हा दाखल होई. मात्र, नवीन अध्यादेशानुसार सरसकट कोणीही बेपत्ता झाला असेल त्या प्रकरणात अपहरणाचाच गुन्हा नोंदवावा लागत असल्याने पोलिस ठाण्यातील गुन्ह्याचा भारही (लोड) तसा वाढला आहे. ---------- पूर्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com